Bollywood

Bollywood Stories : अमिताभ बच्चन ते अजय देवगण..या अभिनेत्यांनी वर्षानुवर्षे लपवून ठेवली ओळख; खरी नावं ऐकून बसेल धक्का

Bollywood Stories : अमिताभ बच्चन ते अजय देवगण; या अभिनेत्यांनी वर्षानुवर्षे लपवून ठेवली ओळख; खरी नावं ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड मध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी आपली नावे बदलली आहेत. खऱ्या आयुष्यात कोणी इन्कलाब श्रीवास्तव आहे तर कोणी साजिद अली खान. पण वर्षानुवर्षे या बॉलिवूड कलाकारांनी आपली खरी ओळख लपवून ठेवली आहे.

काही वेळा व्यक्तीचे नशीब बदलण्यातही नाव उपयुक्त ठरते. चित्रपसृष्टीत देखील आपल नशीब बदलविण्यासाठी यश मिळवण्यासाठी असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी आपली नावे बदलली आहेत.

अमिताभ बच्चन –

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे पूर्ण नाव अमिताभ हरिवंश बच्चन आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, ते एकदा त्यांचे आडनाव श्रीवास्तव लिहायचे, जे त्यांच्या वडिलांनी बदलून बच्चन केले. पूर्वी त्यांचे नाव इंकलाब श्रीवास्तव होते, परंतु कवी सुमित्रानंदन पंत यांच्या सूचनेनंतर त्यांचे नाव इन्कलाबवरून बदलून अमिताभ असे करण्यात आले. ज्याचा अर्थ ‘कधीही कमी होणारा न प्रकाश’ असा आहे.

मिथुन चक्वर्ती –

डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले मिथुन चक्रवर्ती हे एके काळी चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती बनलेले स्टार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव काही वेगळेच आहे. त्यांचे खरे नाव गौरांगा चक्रवर्ती आहे. 1976 मध्ये मृगया चित्रपटातून पदार्पण करताना त्यांनी नाव बदलले.

अक्षय कुमार –

बॉलिवूडचा ‘खिलाडी कुमार’ अर्थात अक्षयचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. अभिनेत्याचे हे नाव फिल्मी जगासाठी फारसे आकर्षक नव्हते, म्हणून त्याने आपले नाव बदलले. त्याने आपल्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘हरी ओम एंटरटेनमेंट’ ठेवले आहे.

सैफ अली खान –

पतौडी कुटुंबातील नवाब सैफ अली खान यांचे खरे नाव तुम्हाला क्वचितच माहित असेल. बॉलिवूडमध्ये ‘नवाब’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सैफ अली खानचे खरे नाव ‘साजिद अली खान पतौडी’ आहे. करीना आणि सैफच्या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये अभिनेत्याचे खरे नाव समोर आले आहे.

टायगर श्रॉफ –

जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ याचे खरे नाव टायगर नसून जय हेमंत श्रॉफ आहे. जॅकीने स्वतः एकदा खुलासा केला होता की, लहानपणी अभिनेता त्याला चावायचा, म्हणून तो त्याला टायगर म्हणत असे. त्यानंतर इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तो जय हेमंत श्रॉफमधून टायगर श्रॉफ झाला.

सनी देओल-

धर्मेंद्र यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचं खरं नाव अजय सिंग देओल आहे.

अजय देवगण-

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणला सगळेच ओळखतात. पण त्याचं खरं नाव विशाल वीरू देवगण हे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button