Amalner

? संवेदनशील….नगरपालिका सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांचे पगाराआभावी हाल..निगरगठ्ठ नगरपरिषदेला फुटेना माणुसकीचा पाझर..विनंत्या करून थकले ते वृद्ध मजबूर हात…

? नगरपालिका सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांचे पगाराआभावी हाल..निगरगठ्ठ नगरपरिषदेला फुटेना माणुसकीचा पाझर..

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर नगरपालिका सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांचा पगार दिवाळीपूर्वी करा असे जाहिर आवाहन नागरी हित दक्षता समिती तर्फे करण्यात आलेले आहे.

अमळनेर नगरपालिका शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षक व विधवा शिक्षिकांचा चार महिन्यापासून पगार झालेला नाही अनेकांचा कौटुंबिक खर्च निवृत्ती वेतनातून होतो. अश्या वयोवृद्ध असलेल्या निवृत्तानां औषधालाही पैसे नाहीत अशी विदारक व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्बल वयोवृद्ध व शक्तिहीन सेवानिवृत्त शिक्षक सदरचा अन्याय सहन करण्याच्या पलिकडे काही करू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर नागरी हित दक्षता समिती ने सेवानिवृत्त शिक्षकांचा थकित पगार दिवाळीपूर्वी करावा असे जाहिर आणि विनम्र आवाहन केले आहेत.
दिनांक २९ऑक्टोंबर २०२० रोजी झालेल्या नागरी हित दक्षता समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत श्रावण गुरुजी व सत्तार मास्टर यांनी सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांची आर्थिक परिस्थितीचा प्रश्न कथन असता सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. नागरी दक्षता समिती ही सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षकांसोबत आहे असे आश्वासन समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यावेळी बोलतांना यांनी दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button