अर्बन बँक चा सौजन्याने तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागाचा मार्गदर्शनाने पन्नालाल चौक येथे निर्जंतुकिकरण प्रवेशद्वार
योगेश पवार
अमळनेर शहरातील कॉन्टिनेटल झोन(रेड झोन) (झामी चौक, आम्लेशवर नगर इ. )म्हणून घोषित करण्यात आला आहे त्या भागात जाण्यासाठी प्रशासनाने एक च प्रवेश ठिकाण पन्नालाल चौक येथे करण्यात आले आहे. तरी सदर ठिकाणी दि अमळनेर अर्बन बँक चा सौजन्याने तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागाचा मार्गदर्शनाने निर्जंतुकिकरण प्रवेश द्वार ची निर्मिती करण्यात आली आहे सदर प्रवेशद्वार लोकासाठी आज माजी आमदार साहेबरावदादा पाटील, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे साहेब, बॅँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, मॅनेजर अमृताआबा पाटील, संचालक लालू शेठ, शांताराम ठाकूर, प्रवीण जैन,प्रदीप अग्रवाल,अभिषेक पाटील,भरत ललवाणी,बाळासाहेब संदानशीव, पंकज चौधरी, कर्मचारी प्रवीण सातपुते,अवी जाधव, किरण बागुल ,विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.बॅँकेचा ह्या कार्यानिमित्त मान्यवरांनी कौतुक करून आभार मानले.