Mumbai

भारत विरूद्ध आॅस्ट्रोलिया यांच्यात आज मूंबईत पहिला वन ङे सामना

भारत विरूद्ध आॅस्ट्रोलिया यांच्यात आज मूंबईत पहिला वन ङे सामना

मूंबई ःआनिल पाटील

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातीलरूद्ध ३ वन-डे सामन्यांच्यारू मालिकेला आयूजपासून सुरुवात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिला सामना खेळवला जाणार आहे. नवीन वर्षात भारतीय संघाने श्रीलंकेवर २-० ने मात करत मालिकेत विजय मिळवला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या रुपाने आता भारतासमोर कडवं आव्हान असणार आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी टीम इंडिया आता सज्ज झालेली आहे. संघात पुनरागमन केलेला भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात असलेल्या नवदीप सैनीने एक दिवसआधी मुंबईत नेट्समध्ये कसून सराव केला.

सरावसत्रादरम्यान दोन्ही गोलंदाजांनी यॉर्कच चेंडू टाकण्याकडे भर दिला. या सरावसत्रादरम्यान दोन्ही गोलंदाजांनी चक्क स्टम्पच मोडले. बीसीसीआयने त्यांच्या या सरावसत्राचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

गेले काही महिने बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता, यादरम्यान इतर भारतीय गोलंदाजांनी संघाची बाजू चांगली सांभाळली. मात्र या काळात बुमराहने आपल्या आक्रमणाची धार कमी न होऊ देता, सर्वोत्तम कामगिरी करत राहणं पसंत केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत बुमराहच्या या भेदक माऱ्याचा सामना ऑस्ट्रेलियन गोलंदाज कसा करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button