Yawatmal

ट्रायबल फोरमची समिती प्रमुख आमदार दौलतजी दरोडा यांचेशी चर्चा

ट्रायबल फोरमची समिती प्रमुख आमदार दौलतजी दरोडा यांचेशी चर्चा

कल्याण समितीच्या दरबारात आदिवासी समाजाच्या समस्यांचा पाऊस

यवतमाळ – प्रतिनिधी प्रफुल्ल कोवे

राज्यात आदिवासी समाजाच्या समस्यांचा डोंगर उभा आहे.आजपर्यत न सुटलेल्या समस्यांचा डोंगर फोडून,समाजाच्या विकासासाठी वाट मोकळी करुन देण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार दौलतजी दरोडा आणि समिती सदस्य आमदार भिमरावजी केराम यांची ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांनी भेट घेऊन राज्यातील व जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्यांचा अक्षरशः पाऊस पाडून प्रत्येक समस्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा केली.विविध समस्यांची उकल करुन सोडविण्याची मागणी निवेदन देऊन केली. या चर्चेत गेल्या दोन वर्षापासून जनजाती सल्लागार परिषदेची न झालेली बैठक, खावटीत झालेला कोट्यावधीं रुपयांचा घोटाळा, आदिवासी उमेदवारांची थांबलेली विशेष भरती मोहीम, ३५ वर्षापासून पेसा क्षेत्रांची न झालेली पुनर्रचना, वर्षानुवर्षे परंपरागत कसत असलेल्या आदिवासी बांधवांना वनजमिनीचे पट्टे, त्यावरील ताबा व शेती करण्यासाठी कर्ज,गेल्या सहा वर्षात शासकीय आश्रमशाळेत विविध कारणास्तव विद्यार्थ्यांचे झालेले म्रुत्यु,केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आयोग,महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर प्रतिनिधित्व, राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आदिवासी उमेदवारांना उंचीत ५ से.मी.सूट,सर्व शिष्यवृत्ती व वसतीगृह प्रवेश यात पालकांची उत्पन्न मर्यादा वाढविणे,गैर आदिवासी कर्मचारी – अधिकारी यांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे,अनुसूचित क्षेत्रात स्थानिक उमेदवांमधून न भरलेली पदे,कुमारी मातांना व्यावसायिक प्रशिक्षण,व्यवसायासाठी कर्ज व राहण्यासाठी घरकुल,पारधी समाजातील लोकांना राशनकार्ड, मतदान ओळखपत्र, घरकुले,हलबी समाजाला खावटी,जिल्ह्यात आदिवासी वसतीगृहा करीता जागा उपलब्ध करुन देऊन त्यावर बांधकामे,८८ वर्षात यवतमाळ नगर परिषदेत अनुसूचित जमातीला अध्यक्ष पदाचे न मिळालेले आरक्षण, नगरपरिषद हद्दीत असलेल्या लोहारा येथील आदिवासी बांधवांनी अर्ज करुनही न मिळालेले घरकुले आदी समस्यांवर कल्याण समितीशी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांनी अभ्यासपुर्ण सविस्तर चर्चा करुन समितीपुढे समस्या सोडविण्याचे आव्हान उभे ठेवले.यावेळी ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे,जिल्हा महासचिव दीपक करचाल, नगरपरिषदेच्या नियोजन सभापती चंद्रभागाताई मडावी, नगरसेवक भानुदास राजने, ओंकार मडावी, संतोष किनाके,दिलीप मडावी, नामदेव सोयाम,सुधाकर राऊत,किशोर भोयर,गणेश गावराने,कुंदन चुलपार,विष्णू कुडमते
आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button