रोजगार प्रश्नांवर जळगाव जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक काढली शहरात बाईक रॅली
200 – 300 मोटरसायकल घेऊन युवक काँग्रेस रस्त्यावर आक्रमक
जिल्हाअधिकारी राऊत जळगाव यांना दिले निवेदन
रविवार असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी युवक काँग्रेस च्या विनंतीला मान देऊन निवेदन स्वतः स्वीकारल्या बद्दल युवक काँग्रेस ने मानले आभार.
जळगाव:-रजनीकांत पाटील
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सचिव प्रियंकाजी सानप यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हा अधिकारी जळगाव यांना वाढत्या बेरोजगारी व वर्षांची २ कोटी नवे रोजगार या गंभीर प्रश्नांच्या बाबतीत बेरोजगारिवर मेळावा घेण्यात आला.
मेळावा नंतर युवक काँग्रेस बाईक रॅली काढून विरोध प्रदर्शन करण्यात आले. या मोटारसायकल रॅली मध्ये युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यानकडून घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. 200 ते 300 मोटार सायकल घेऊन युवक काँग्रेस आक्रमक स्वरूपात दिसून आले. सद्या या कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेत व बेरोजगारीचे भीषण संकट सद्या उभे राहिले आहे. सर्व बाबींना गांभीर्याने घेऊन व युवकांच्या भविष्य लक्षात घेऊन तात्काळ रोजगार निर्मिती करावी व युवकांना न्याय द्यावा. अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस निवेदनात करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून नुकतेच भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून -२३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे समोर आले आहे. प्रियंकाजी सानप, राष्ट्रीय सचिव युवक काँग्रेस
तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला होता. यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे 12 ते 13 करोड लोक बेरोजगार झाले तेवढ्याच कुटुंबांचे जगणे रोजगाराविना मुश्किल झाले आहे.:- प्रा. हितेश पाटील जिल्हाध्यक्ष यु. काँ.
या वेळी राष्ट्रीय सचिव प्रियंकाजी सानप, जिल्हा अध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील, प्रदेश महासचिव मुक्तदिर देशमुख, प्रदेश सचिव योगेश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसावी, भुसावळ विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, जळगाव विधानसभा अध्यक्ष मुजीब पटेल,अमळनेर शहरअध्यक्ष तौसिफ तेली, गजेंद्र साळुंखे, कुणाल पाटील, महेश पाटील, सईद तेली, गौरव पाटील, घनश्याम महाजन, पवन पाटील बहादरवाडी, तसेच युवक काँग्रेस चे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






