Yawatmal

घाटंजी ,पांढरकवडा येथे होणार भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नाला यश..

घाटंजी ,पांढरकवडा येथे होणार भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नाला यश..

यवतमाळ : जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या घाटंजी व पांढरकवडा या तालुक्याच्या ठिकाणी भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन साकारण्यात येणार असल्यामुळे बिरसा क्रांती दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे समाजाच्या वतीने आभार मानले.

आदिवासी समाजातील लोककला , सामुहिक लग्न, परंपरागत सण,उत्सव आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याच्या द्रुष्टीने आदिवासी भागामध्ये जागा उपलब्ध नसते त्यामुळे त्यांच्यातील असलेले कौशल्य व इतर गुणांना वाव नसतो आणि त्यांच्यात असलेले कौशल्य आणि सांस्कृतिक बुजरेपणा घालविणे यासाठी आदिवासी भागामध्ये सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटंजी व पांढरकवडा येथे भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन साकारण्यात येणार असल्यामुळे आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नाने ८ फेब्रुवारी २०२० च्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या ट्रायबल डीपीसी मध्ये ठराव घेण्यात आला .

त्यानुसार पांढरकवडा नगरपरिषदेने ३ फेब्रुवारी २०२१ ला तातडीची विशेष सभा घेऊन आपल्या नगरपरिषद हद्दीतील सर्वे.नं.१०/२ मधील मधील १ एकर जागा आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी मंजूर करुन दिलेली आहे. या जागेवर १ कोटी रुपयाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

तसेच घाटंजी नगरपरिषदेनेही १ मार्च २०२१ रोजी विशेष सभा घेऊन आपल्या नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं.३७/३ मधील १ एकर जागा आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी मंजूर करुन दिलेली आहे. या जागेवरही १ कोटी रुपयाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

आदिवासी समाजासाठी असलेले सांस्कृतिक भवन हे बिगर आदिवासी बांधवांना सुद्धा नाममात्र दरात उपलब्ध करुन देणार असल्याचे आमदार डॉ. धुर्वे यांनी यावेळी सांगितले आहे. नगराध्यक्षा यांचेही आभार मानले.
घांटजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा नयनाताई शैलेश ठाकूर , पांढरकवडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैशालीताई अभिनय नहाते यांनी आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी तातडीने जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल बिरसा क्रांती दलाने त्यांचे आभार मानले.
यावेळी बिकेडी महासचिव प्रमोद घोडाम, जिल्हाध्यक्ष प्रा.कैलास बोके, जिल्हा महासचिव प्रफुल कोवे, अजय घोडाम, संजय मडावी, गणेश फुपरे, संतोष कनाके, शिवनारायण भोरकडे आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button