Yawatmal

दिवंगत फौजदार राजेंद्र कुळमेथे यांना ‘ शहीद ‘ दर्जा द्यावा..ट्रायबल फोरम ची मागणी…

दिवंगत फौजदार राजेंद्र कुळमेथे यांना ‘ शहीद ‘ दर्जा द्यावा

यवतमाळ – दिवंगत सहा. फौजदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे यांना
‘ शहीद’ दर्जा द्यावा.अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , ग्रुहमंत्री दिलीपजी वळसे पाटील ,ग्रुह विभागाचे अपर मुख्य सचिव यांचेकडे ट्रायबल फोरमने केली आहे.
सहा.फौजदार राजेंद्र कुळमेथे हे दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी कर्तव्यावर असतांना मारेगांव न्यायालयाचा अटक वारंट बजावण्याकरीता मारेगांव तालुक्यातील हिवरी येथे गेले असता आपले प्राणाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून आरोपी अनिल लेतू मेश्राम या अट्टल गुन्हेगारास पकडण्याचा प्रयत्न केला. पण दरोडेखोर आरोपी व त्याच्या आईने त्यांचे डोक्यावर व तोंडावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन हल्ला केला. ते जखमी होऊन खाली पडले.त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगांव येथे नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी करुन त्यांना म्रुत घोषित केले. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे त्यांचे कुटुंबावर दु:खाचे संकट कोसळले आहे.

पोलीस महासंचालकाचीही शिफारस
राजेंद्र कुळमेथे शहीद झाल्यामुळे दि.२१ आँक्टोबर २०१९ रोजी महामहिम राज्यपाल व पोलीस महासंचालक यांचे प्रमुख उपस्थितीत पोलीस मुख्यालय नायगाव मुंबई येथे त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.पोलीस महासंचालक यांनी ६ फेब्रुवारी २०१९ रोजी ग्रुहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना पत्र लिहून शिफारस ही केली तरीही त्यांना शासकीय अभिलेखात शहीदांचा दर्जा देण्यात आलेला नाही.

विशेष बाब म्हणून सामावून घ्यावे.
सदर घटना घडून तीन वर्षे पूर्ण झाली.
शहीदाचा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देतांना वारसाचे नांव अनुकंपाधारकांच्या सामान्य प्रतिसुची मध्ये न देता स्वतंत्र त्यांच्या वेगळ्या यादीत नांव आले नाही. त्यामुळे त्यांचे वारसदार अनुकंपा लाभापासून वंचित राहिले आहेत. शहीदाचा दर्जा देऊन त्यांच्या वारसास विशेष बाब म्हणून सामावून घेण्यात यावे.
– अँड.प्रमोद घोडाम
संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button