Yawal

यावल पं.समिती यांच्या कडून दिव्यांग सेनेच्या मागण्या मंजूर

यावल पं.समिती यांच्या कडून दिव्यांग सेनेच्या मागण्या मंजूर

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन,जिल्हा सल्लगार राहुल कोल्हे यांच्या आदेशानुसार दिव्यांग सेना यावल तालुका अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी यांनी गटविकास अधिकारी डॉ.मंजूश्री गायकवाड यांना निवेदन दिले होते,त्यात यावल तालुका ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याणकारी ५ % निधीचे वाटप करण्यात यावे, तसेच विना अट घरकुल योजना, घरपट्टी मध्ये ५० टक्के सूट,ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांचा सर्वे करावा.तसेच सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळावा.आदी मागण्या नमूद करण्यात आल्या होत्या. गटविकास अधिकारी यांनी तात्काळ मागण्या मंजूर करून , त्या नुसार सहाय्यक गटविकास अधिकारी के.सी सपकाळे पंचायत समिती यावल यांनी मंजुरी चे पत्र दिले.त्यावेळी हबीब तडवी, विरेंद्र मोरे पंचायत समिती,जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, तालुका उपाध्यक्ष अशोक कोळी,तालुका सचिव चेतन तळेले,धिरज मोतीवाले हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button