Maharashtra

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यावर्षी घरातच साजरा करावा – रिपाई प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यावर्षी घरातच साजरा करावा – रिपाई प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे

परंडा तालुका प्रतिधिनी सुरेश बागडे

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार कसल्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक उत्सव साजरे करू नयेत तसेच आपण सर्व भारतीय संविधानावर विश्वास असणारे लोक आहोत त्यामुळे शासनाचा आदेश हा संविधानाचाच आदेश मानत भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदेश अस समज़ुन व सामाजिक गांभीर्य व आपली जबाबदारी लक्षात घेता आपण दरवर्षी १४ एप्रील रोजी साजरा होणारा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यावर्षी घरातच साजरा करावा, असे आवाहन रिपाई प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांनी केले आहे.
सार्वजनिक जयंती व भिम महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करत घरामध्ये जयंतीचा उत्सव साजरा करताना सर्वांनी पांढरा पेहराव करावा तथागत बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुजन करावे, हार, फुल नसली तरी चालेल, आपल्या घरात जर पंचशील किंवा निळा झेंडा असल्यास आपल्या घरावर किंवा बाल्कनीमध्ये फडकवा, कुणीही बाहेर येवु नये, आपल्या घरातच बुध्द भीम गीत लावावीत व आपल्या घरात असलेल्या बुध्द/फुले/शाहु/ किंवा आंबेडकरी विचारांवर आधारित किमान एक पुस्तक वाचावे, लहान मुलांनी फुले/ शाहू/आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित निबंध लिहावेत, चित्र काढावेत, कविता लिहाव्यात, गाणी लिहावी. घरात असलेल्या अन्न- धान्य सामानातुन गोड पदार्थ बनवावेत अशा पध्दतीने आपण भाग्यविधात्याची जयंती आपल्या घरात साजरी करावी, असे आवाहन रिपाई प्रदेश चिटणीस (आ) संजयकुमार बनसोडे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button