आटपाडी

संविधान , संसद , सर्वोच्य न्यायालय आमच्यासाठी प्राणप्रिय सादिक खाटीक यांचे गौरवोदगार

संविधान , संसद , सर्वोच्य न्यायालय आमच्यासाठी प्राणप्रिय
सादिक खाटीक यांचे गौरवोदगार

आटपाडी प्रतिनिधी राहुल खरात
भारतीय संविधान , संसद , सर्वोच्य न्यायालय आमच्यासाठी प्राणप्रिय आहे , अयोध्या प्रश्नी सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो असे मत मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
आटपाडी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार श्री. सचिन लंगुटे , पोलीस निरीक्षक श्री. बजरंग कांबळे , कृषी अधिकारी श्री. राहुल जितकर , तालुक्यातील विविध गावचे पोलीस पाटील , मुस्लीम समाजाचे नेते फिरोज खाटीक , माजी ग्रा पं . सदस्य बशीर मुल्ला , विदयमान ग्रा पं . सदस्य बॅलीस्टर मुल्ला , दिलावर शेख , महंमद शेख , रियाज शेख ,ताजुद्दीन इनामदार , एजाज मुलाणी , इन्नुस मुलाणी , रियाज मुलाणी , अय्याज मुलाणी , भिंगेवाडीचे माजी सरपंच नजीर शेख , हामीद शेख , मोहीद्दीन शेख , आशीक शेख , मुसा शेख , राजू शेख ,आब्बास मुलाणी , इत्यादींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली .
सादिक खाटीक पुढे म्हणाले , एकता, बंधूता , सर्वधर्म सदभाव या विचारधारेने पिढयान पिढया आम्ही विविध धर्मिय गुण्यागोविंदाने रहात आलो आहोत . वर्तमान आणि भविष्यातही हीच बंधूत्वाची नाळ आणखी मजबूत होईल .आटपाडी तालुक्याच्या शे – दोनशे वर्षाच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास धार्मिक सलोखा , सदभाव , भिन्न धर्मिय विविध सण उत्सवात सर्वांचाच असणारा सहभाग आम्ही सर्व भारतीय बांधवच असल्याचा प्रत्यय दाखवून देत आहे .
तहसीलदार सचिन लंगुटे यांनी अयोध्येतील निकाल हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असून सर्वांनीच याचा आदर करीत आपल्यातील एकोपा कायम ठेवावा , असे आवाहन केले .
विविध मुलभूत प्रश्नांसह अवकाळी पावसाच्या नुकसानीने लोक त्रस्त आहेत . अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काही लोक असंतोष पसरवण्याचा प्रयत्न करतील पण त्याकडे लक्ष न देता आपल्यातला एकोपा , बंधू भाव कायम ठेवा , सोशल मिडीयावरून काही अनुचित मेसेज आल्यास तो पुढे फॉरवर्ड न करता प्रशासनाच्या निदर्शनास आणून दया , अशांवर कडक कारवाई केली जाणार आहे . असेही त्यांनी स्पष्ट केले .
निकालाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवल्याचे स्पष्ट करून पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी दक्ष रहावे , अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मिडीयावर काही गैर आल्यास प्रशासनास सत्वर कळविण्याचे त्यांनी आवाहन केले .
पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी मुस्लीमांच्या मोहरम मध्ये, हिंदूच्या गणेशोत्सामध्ये सर्वधर्मीय बांधव उत्साहाने सहभागी होऊन एकमेकांच्या धार्मीक भावना जतन करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात , ही पीढयान पिढयाची आटपाडी तालुक्याची बंधूभावाची परंपरा असल्याचे स्पष्ट केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button