Patur

पातुर तालुक्यातील पांदन रस्ते शेतरस्ते व शिवदांड रस्ते मोकळे करून बनवण्याकरिता छावा संघटना सरसावली

पातुर तालुक्यातील पांदन रस्ते शेतरस्ते व शिवदांड रस्ते मोकळे करून बनवण्याकरिता छावा संघटना सरसावली

विलास धोंगडे अकोला

पातूर : छावा संघटनेच्या वतीने माननीय तहसीलदार व प.स गटविकास अधिकारी यांना पातूर तालुक्यातील भांडण दस्ते , शिवदांड शेतरस्ते मोकळे करून त्वरित कामे करून सुरू करण्याकरिता निवेदन देण्यात आले
माननीय जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज छावा संघटना पातुर तालुका यांच्या वतीने माननीय तहसीलदार दीपक बाजड, प.स. गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे यांना निवेदन देण्यात आले पातुर तालुक्यातील शेत रस्ते, पांदन रस्ते, शिवदांड रस्ते हे अतिशय खराब असून अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत हे अतिक्रमण मोकळे करून शेत रस्ते कामे सुरू करण्याकरिता आज या संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी तालुका अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरित या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून कामे सुरू करावी जेणे करून पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतातील मल वाहण्याकरिता मोकळीक मिळेल व या कामांनी दिलासा मिळेल निवेदन देण्याकरिता छावा संघटना जिल्हाप्रमुख गोपाल राव गालट ,विलासराव धोंगडे, गोपाल घोरे, दामा भाऊ तांबडे, आनंदा मानकर, मनीष नाकट, देवेंद्र माहोकार, गजानन शिंदे, प्रकाश अंभोरे, शिव आंबंटकर, संतोष भोरे, रामदास तांबळे, अजित अलाट, अजित उत्तरकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button