Arondol

प्रेस नोट औदुंबर साहित्य रसिक मंच मार्फत विलास मोरेंचा सत्कार सोहळा संपन्न..

प्रेस नोट औदुंबर साहित्य रसिक मंच मार्फत विलास मोरेंचा सत्कार सोहळा संपन्न..

विक्की खोकरे एरंडोल

एरंडोल : दि . औदुंबर साहित्य रसिक मंच , एरंडोल मार्फत विलास मोरे यांना राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार मिळाल्याप्रित्यर्थ दि . ७ फेब्रुवारी २०२१ सत्कार सोहळा संपन्न झाला . या बाबत सविस्तर वृत्त असे की विलास कांतीलाल मोरे यांचे शाळेला सुडी लागली रे या बालकविता संग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या स्व . यशवंतराव चव्हाण बालकवी वाङ्मय पुरस्कार जाहीर इ गाल्यामुळे त्याचा एरंडोल येथील सितारामभाई मंगल कार्यालयात औंदुबर साहित्य रसिक मंचचे अध्यक्ष अँड . मोहन बी शुक्ला व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सपत्निक सत्कार करण्यात आला . यावेळी अँड मोहन शुक्ला यांनी बालकविनी ज्या गावी प्राथमिक शिक्षण घेतले त्या गावी म्हणजे एरंडोलला हा सन्मान प्राप्त झाल्याने आनंद व्यक्त केला.तसेच धरणगाव हे बालकविंचे जन्मगाव देखील एरडोलचे लगतच असल्याने त्यात दुधात साखर पडल्याचे प्रतिपादन करुन विलास मोरे यांना पुडील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या . प्रमुख मान्यवर म्हणुन श्री देविदास महाजन व शालिक गायकवाड यांनी विलास मोरेंच्या अस्सल बावन कशी लिखाणाचा वारंवार उल्लेख केला . या पुरस्कारामुळे एरंडोलचे नाव साहित्यिक क्षेत्रात सुवर्ण अक्षरात कोरले गेले असल्याचे म्हणणे मांडले . कवी विलास मोरे यांनी हा हा पुरस्कार मला औदुंबरच्या अनेकविध साहित्यिक चळवळीच्या प्रेरणेतुन प्राप्त झालेला आहे अशी कृतज्ञता व्यक्त करुन पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे अधिक सकस लिखाणाची जबाबदारी आल्याचे मान्य केले . मनोगत व्यक्त हा माझा एरंडोलकरांकडून आणि औदुंबर कडुन घरचाच सत्कार असल्याने अंतकरण भरुन येत असल्याचे नमुद करतांनाच ते सद्गदीत झाले . सत्कार सोहळ्यास अरुण माळी , विजय जाधव , बापु मोरे , अमितदादा पाटील वगैरे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या . प्रास्ताविक विजय भामरे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रविण महाजन यांनी केले . कार्यक्रमास डॉ . राहूल वाघ , नरेंद्रसिंह पाटील , शेखर येवलेकर , गोविंद देवरे , आरती ठाकूर , प्रा.आर एस पाटील , अॅड अजिक्य काळे , अॅड सुजित पाठक , नाराण मोरे जगदीश मोरे , उत्तमराव पाटील गुरुजी , दिलीप पांडे , साहेबराव पाटील तुषार मोने , भिमराव सोनवणे , विनोद कोमलसिंग पाटील , निशा मोरे , अंजली निगुडकर , गौरी मानुधने इत्यादी मान्यवर उपस्थित होते . विशेष म्हणजेसभेच्या सुरवातीला एरंडोल येथील अमर जवान राहूल पाटील यांचे सह किशोर कुंझरकर व मधुकर दुबे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली होती .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button