Patur

जांब येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

जांब येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

पातूर : पातूर तालूका येथील जांब गावात बिरसा क्रांती दल व भारतीय अस्मिता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यभान लठाड हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम माहोरे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय अस्मिता पार्टी बिरसा
क्रांती दल अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे उपस्थितीत होते .यावेळी धरति आबा बिरसा मूंडा आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे डा बाबासाहेब आंबेडकर छञपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले. यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक श्यामराव शिंदे यांनी केले संतोष ठाकरे यांनी आदिवासी दिनाचे महत्व सांगितले. यावेळी बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे बिरसा क्रांती दल पातूर ता अध्यक्ष रामचंद्र लोखंडे ता उपाध्यक्ष हरिदास करवते ता उपाध्यक्ष विलास धोंगडे पातूर ता उपाध्यक्ष दिपक डाखोरे बिरसा क्रांती दल ता उपाध्यक्ष सागर पांडे नितिन घायवट प्रफुल्ल घायवट जयराम लठाड कैलास डाखोरे वामन शिंदे अमर डाखोरे काशीराम हाडे जगदेव शिंदे आदी उपस्थित होते यावेळी गावातील तरूण वर्गाने जाबं गावात बिरसा क्रांती दला शाखेचे उद्घाटन केले. त्यांना बिरसा क्रांती दल अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे यांनी नियुक्ती पञ देउन व शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले बिरसा क्रांती दल जाबं शाखा अध्यक्ष उमेश अंभोरे शाखा उपाध्यक्षपदी सूखराज शिंदे महासचिव उमेश डाखोरे रूपेश अंभोरे रामदास भोडणै याची नेमणूक करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामराव शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल घायवट यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button