Chalisgaon

ब्राम्हणशेवगे येथे पर्यावरण रक्षणाची नवी पहाट : वडिलांचे स्मरणार्थ स्मशानभूमीत केले वृक्षारोपण रक्षा पाण्यात विसर्जित न करता दिली झाडाना

ब्राम्हणशेवगे येथे पर्यावरण रक्षणाची नवी पहाट : वडिलांचे स्मरणार्थ स्मशानभूमीत केले वृक्षारोपण. रक्षा पाण्यात विसर्जित न करता दिली झाडानासोमनाथ माळीब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव येथे झाडाच्या लागवडीसाठी,वृक्षारोपणासाठी नेहमी जनजागृती व आवाहन करण्यात येते. त्याचा परिणाम म्हणून नागरिक पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.झाडे लावून जतनही स्वयंप्रेरणेने करायला लागली आहेत.नुकतेच गावातील ह.भ.प.पोपट नथू शेळके यांचे निधन झाले त्यांच्या परशराम व युवराज या मुलांनी व नातेवाईकानी सारीच्या दिवशी स्मशानभूमीत आपल्या वडिलांच्या आठवणी कायम स्मरणात रहाव्यात जुन्या रुढी परंपरेना फाटा देत वृक्षारोपण करून रक्षा झाडांना देऊन एक आदर्श पाऊस उचलले आहे. त्याच्या या उपक्रमाचे गावातून स्वागत होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button