Aurangabad

क्रांती चौक येथे कोचिंग क्लासेस चालकांचे साखळी आंदोलन

क्रांती चौक येथे कोचिंग क्लासेस चालकांचे साखळी आंदोलन

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असल्याने औरंगाबाद शहरातील निर्बंध हटविण्यात आले आहेत. सर्व काही खुले असताना कोचिंग क्लासेस बंद का? असा सवाल उपस्थित करत क्लासेस चालकांनी आज सकाळी क्रांती चौकात साखळी आंदोलन केले. कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्या, अशा आशयाचे फलक हातात घेऊन शेकडो प्राध्यापक, कोचिंग क्लासेस चालकांनी घोषणाबाजी केली.

यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. बँकेचे हप्ते, संस्था, घर भाडे थकल्याने कोचिंग क्लासेस चालक, प्राध्यापक आर्थिक संकटात सापडले आहेत.

त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी क्लासेस चालकांनी आज सकाळी क्रांती चौकात मानवी साखळी पध्दतीने आंदोलन केले. यावेळी कोचिंग क्लासेसचे अध्यक्ष पी. एम. वाघ, कार्याध्यक्ष प्रशांत बनसोडे, प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे, प्रा. अरुण पठारे आदी प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button