Nashik

हार्दिक सुतारीसह दोघांवर कॉपीराईट चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल

हार्दिक सुतारीसह दोघांवर कॉपीराईट चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल

उदय वायकोळे

औरंगाबाद येथील नोबल पब्लिकेशन चे संचालक श्री कारभारी भुतेकर सर यांनी सातारा पोलीस ठाणे औरंगाबाद शहर येथे हार्दिक सुतार नामक व्यक्तीवर व मिशन खाकी वर्दी व्हाट्सएप ग्रुपच्या ऍडमिनवर कॉपीराइट व ट्रेडमार्क चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की कारभारी भुतेकर सर यांचे पोलीस भरती.

हार्दिक सुतारीसह दोघांवर कॉपीराईट चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन साठी नोबल पब्लिकेशन नावाचे स्पर्धा परीक्षा केंद्र व प्रकाशन आहे. माझी नोकरी डॉट इन या संकेतस्थळाचा डेव्हलपर हार्दिक सुतारी रा डहाणू जि पालघर व मिशन खाकी वर्दी या व्हाट्सएप ग्रुपचा ऍडमिन यांनी भुतेकर सर यांच्या नोबल 216 पोलीस भरती प्रश्नसंच या पुस्तकाच्या 200 पानांची पीडीएफ स्वरूपात कॉपी करून संकेतस्थळ व व्हाट्सएपच्या ग्रुपवर प्रकाशित केली.याप्रकरणी भुतेकर यांची कोणतीही परवानगी न घेतल्याने सरांनी कॉपीराईट व ट्रेडमार्क चे उल्लंघन केल्याप्रकरणी कॉपी राईट ऍक्ट नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button