Karnatak

श्री संत सेवालाल महाराज यांची २८२ वी जयंती साजरी

श्री संत सेवालाल महाराज यांची २८२ वी जयंती साजरी

कर्नाटक महेश हुलसूर

कर्नाटक : हुलसूर तालुक्यातील आंतरभारतीय तांडा, सायगाव तांडा, गोवर्धन तांडा,मिरखल तांडा येथील बंजारा समाजातील महिला पुरुष मिळुन हुलसूर याठिकाणी शनिवारी श्री ईसमपल्ली भवानी माता मंदिरा पासून ते गांधी चौकातून सरळ श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठा पर्यंत बंजारा समाजातील पारंपरिक कपडे वेषभूषा करून ढोल ताशांच्या तसेच डीजेच्या गजरात जय सेवालाल जय घोषणा देत व रथावर बिदरचे बंजारा समाजाचे गुरु पुज्य गोविंद महाराज, गोवर्धन तांडा प्रेमा जाधव, हिरु तुळशीराम विराजमान होते.
व श्री संत सेवालाल महाराज यांची फोटो ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी बंजारा समाजातील महिला नागरिक तसेच खासदार भगवंत खुबा, माजी आमदार मल्लिकार्जुन खुबा,भाजप प्रमुख संजय पटवारी,जि.पं.सदस्य सुधीर काडादी,ता.पं.अध्यक्ष सिद्रामअप्पा कामणा,जि.पं.सदस्य राजेश्वर गुंडू रेड्डी,भाजप नेते शरणु सलगर,माजी जि.पं.अध्यक्ष अनिल भुसारे, भाजप प्रमुख प्रदिप वाताडे, भाजप प्रमुख सुर्यकांत चिलाबट्टे, काँग्रेस नेते बाबु होणानाईक आदी मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरला.
श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठात कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून व श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधीपती डॉ शिवानंद महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित दिव्य सानिध्य बिदर शक्ती धामचे पीठाधीपती पुज्य श्री संत गोविंद महाराज, प्रेमा जाधव, ग्रा.पं.अध्यक्ष मंगलाबाई डोणगावकर, काँग्रेस नेते बाबु होणानाईक, ता.पं.सदस्य गोविंदराव सोमवंशी, माजी ता.पं.सदस्य गंगुबाई पवार, प्रेमसिंग राठोड, परशुराम, विनायक पवार, देविदास पवार आदी हजर होते.
डॉ शिवानंद महास्वामीजी बोलताना – सरकार मागे उरलेल्या व गरीब नागरिकांना आरक्षण द्यावे राज्यात प्रत्येक जण आंदोलन करत आहेत सर्वच धर्मात गरिब असतात अल्पसंख्याक गरिब जे आहेत अशा नागरिकांना आरक्षण द्यावे लिंगायत धर्माला स्वातंत्र्य धर्म देले तर बसवण्णा चे भारत भर प्रसार प्रचार होईल असे बोलत होते.
गोविंद महाराज – बंजारा समाज हा मागुन खाण्याचा नाही काम करून खाण्याची शक्ती आहे श्री संत सेवालाल महाराज यांचे चमत्कार खूप आहेत ते सांगत की तुम्ही शिक्षण घ्या दुसर्याना शिक्षण द्या त्याचे बोल आहेत असे बोलत होते.
स्वागत व आभार परशुराम राठोड यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button