Amalner

साहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंतीनिमित्त साप्ताहिक ‘लेखन मंच ‘चे प्रकाशन

साहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंतीनिमित्त साप्ताहिक ‘लेखन मंच ‘चे प्रकाशन

आजी माजी आमदारांसह उपस्थित अधिकारी मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा!

नूरखान

अमळनेर -१ ऑगस्ट साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शताब्दी जयंतीचे औचित्य साधून साप्ताहिक ‘लेखन मंच ‘चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत साहित्यिक कवी, प्रबोधनकार व समाज सुधारक ,साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या शताब्दी जयंती दिनी अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ आयोजित अभिवादन कार्यक्रमात या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून साप्ताहिक ‘लेखन मंच’ प्रथम अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यमान आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील ,प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार मिलिंद कुमार वाघ, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड ,पी.आय अंबादास मोरे , गोपनीय शाखेचे डॉ.शरद पाटील,पं.समिती माजी सभापती श्याम अहिरे ,भाजप चे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,आत्मा कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास मोरे,योगीराज चव्हाण,रा का चे सुनील शिंपी,राहुल गोत्राळ,दर्पण वाघ,सनी गायकवाड,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नरेंद्र निकुंभ,हितेश शहा,पप्पू परदेशी, प्रा.डॉ.विजय तूंटे,नगरसेवक श्याम पाटील,नगरसेवक निशांत अग्रवाल, बी.आर.पी.चे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे, रणजित शिंदे ,नगरसेवक शाम पाटील पत्रकार उमेश धनराळे, मिलिंद पाटील, भटू वाणी, जयवंत वानखेडे ,गौतम बि-हाडे, सचिन चव्हाण, जितेंद्र पाटील ,प्रा. जयश्री साळुंखे ,प्रा‌ .विजय गाढे , संजय मरसाळे, सुरेश कांबळे, समाधान मैराळे ,
काशिनाथ चौधरी, आर जे.पाटील राहुल बहिरम, नूरखान, बाळासाहेब सोनवणे, मिलिंद निकम सर ,ए.एम.मोरे प्रविण बैसाणे, हरिश्चंद्र कढरे , जितेंद्र कढरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम अंकाचा शुभारंभ झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी’ लेखन मंच ‘चे कार्यकारी संपादक अजय भामरे सर यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button