Parola

टोळी येथील दलित विद्यार्थिनीवर अत्याचार करुण ठार केल्याच्या घटनेची सी बी आय चौकशी करा चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र राज्य, यांच्याकडून राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडे मागणी

टोळी येथील दलित विद्यार्थिनीवर अत्याचार करुण ठार केल्याच्या घटनेची सी बी आय चौकशी करा चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र राज्य, यांच्याकडून राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडे मागणी

देविदास चौधरी पारोळा

पारोळा : टोळी ता. पारोळा येथील दलित चर्मकार समाजाची बी एसस्सीला शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थिनीवर गावातील गुन्हेगारी प्रवृतीच्या आरोपीनी सामुहिक बलात्कार करुण अनोळखी ठिकाणी नेऊन पुरावा नष्ट करण्यासाठी व गुन्हा लपविण्यासाठी त्या मुलीला विष पाजुन ठार करण्यात आले, त्याबाबत पारोळा पोलिस स्टेशन येथे अनुसुचित जाती अन्याय अत्याचार आणि ऑट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा क्रमांक झिरो चारशे तीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे, टोळी येथे दलित चर्मकार समाजाचे एकच कुटुंब असलेली समाजाची विधवा महिला राहते, त्यांची दोन नंबरची मुलगी पिडित मयता निलिमा सावंत तिच्या लहान भावासोबत दिवाळी सणानिमित्त मामांकडे पारोळा येथे गेलेली होती, बी. एस्सीला शिक्षण घेत असलेल्या दलित समाजाच्या मुलीवर नजर ठेवून असलेल्या गावातील उच्चभ्रु समाजकंटक तीन आरोपी दलित कुटुंबाच्या घरासमोर आणि गावात राहणारे आहेत, त्यांनी मयता पिडित मुलीवर नजर ठेऊन संगनमताने पारोळा येथून अपहरण केले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार करुण पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जहर पाजुन ठार मारले, जाती श्रेष्ठत्वाचा आणि आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही या भावनेतुन केलेला हा खून असल्यामुळे अनुसुचित अन्याय अत्याचार आणि ऑट्रासिटी कायद्या अंतर्गत एफ आर आय क्रमांक झिरो चारशे तिस प्रमाणे दिनांक दहा नोव्हेबर दोन हजार विस रोजी दाखल आहे त्याचप्रमाणे टोळी गावात चर्मकार समाजाचे एकटे कुटुंब आहे आणि राजकीय प्रतिष्ठा असलेल्या आणि जाती श्रेष्ठत्व असुन आरोपींच्या मोठ्या समाज असल्यामुळे पिडित कुटुंबाला कोणीही खरी माहिती मदत करु शकत नाही, मयताची आई ह्या दलित विधवा महिला असुन भूमिहीन आहे, त्यांच्या गरीबीचा फायदा घेऊन आरोपीनी भरदिवसा मुलीचे अपहरण केले तसेच त्यांच्या कुटुंबात लहान लहान मुले आहेत आरोपीं व त्यांचे घरातील लोकांचे केव्हाही रात्री अपरात्री त्यांच्या घराकडून येणे जाणे चालु असते, त्यामुळे दलित पिडित कुटुंबाला आरोपींच्या लोकांकडून सामाजिक दृष्टीने भीती असुन दहशतीच्या छायेत वावरावे लागत आहे, सदर अत्याचार करुण खून केल्याच्या घटनेमुळे त्यांचे घर, संसार आणि कुटुंबाच्या जिविताची सुरक्षततेची कुठलीही शाश्वती राहिलेली नाही, सदर आरोपी हे उच्चभ्रु समाजाचे असुन धनदांडगे म्हणुन गावात वावरतात त्यांच्याच घरासमोर राहून कायदेशीर लढाई लढणे हे अवघड राहील तसे त्यांच्या दलित पिडित कुटुंबाला आणि विधवा महिलेला शक्य नाही म्हणुन दलित पिडित कुटुंबाचे तात्काळ पुर्नवसन करण्यात यावे तसेच शासन निर्णयानुसार पिडित कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी तसेच आमच्या संघटनेच्या असे निदर्शनास येत आहे की सबंधित पोलिसांनी या प्रकरणाला चुकीचे वळण दिलेले आहे, गुन्हा एवढा गंभीर स्वरूपाचा दाखल असुन गुह्यातील सर्व आरोपींवर ऑट्रासिटी कायदा आणि अनुसुचित अन्याय अत्याचार कायद्या अंतर्गत संगनमताने घटना घडवुन आणलेली असल्यामुळे कलम चौतीस नुसार गुन्हा दाखल आहे, तरी सुद्धा आय ओ यांनी आरोपी कोर्टात हजर न करता स्वतः निर्दोष घोषित करुण बाहेरच्या बाहेर आरोपीना सोडण्यात आलेले आहे, यावरून असे दिसते की, आय ओ हे आमच्या समाजाच्या घटनेत सामाजिक बांधिलकी जपत आहेत तसेच त्यांच्या मते आरोपी जर निर्दोष आहेत तर ते आमच्या पिडित कुटुंबाचा तिरस्कार आणि जातिवाद कशामुळे करतात त्याबाबत पोलिस विभागाला वेळोवेळी पिडित कुटुंबानी तक्रार केलेल्या आहेत त्यावर काही कार्यवाही झालेली दिसुन आलेली नाही, काय कार्यवाही झाली तसे तक्रारदारांना माहिती सुद्धा केलेले नाही,सदर दोषारोपपत्र आम्हाला मान्य नाही, सदर दलित घटनेची चौकशी बरोबर झालेली नाही मयता पिडित विद्यार्थिनीला गुह्यातील आरोपी आणि त्यांच्यासोबत असलेली महिला यांनी जातीवाचक शिवीगाळ करुण संगनमताने गुन्हा घडवुन आणलेला आहे आणि सदर दलित मुलीला विष पाजुन ठार केलेले आहे, ठार मारणारे लोक हे उच्चभ्रु समाजाचे असल्याने फिर्यादिला विश्वासात न घेता पुरेपुर दूषित मनाने दोषरोपपत्र बनलेले असावे म्हणुन ते बरोबर झालेले नाही म्हणुन सदर दोषरोपपत्र आम्हाला आणि पिडित कुटुंबाला मान्य नाही तसेच टोळी गावी आमच्या दलित चर्मकार समाजाचे एकटे घर आहे म्हणुन हि घटना दाबण्याचा प्रकार चालु आहे म्हणुन ह्या घटनेमुळे पोलिसांवर आमचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे सदर दलित समाजाच्या शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करुण ठार केले बाबत गुन्हा दाखल असुन ह्या घटनेत साखळी पद्धत असल्याने आणि आरोपीना कठोर शिक्षा होण्यासाठी सदर गुह्याचा तपास योग्य व सखोल चौकशी होणेकरिता सी. बी. आय. यांच्याकडे सोपविण्यात यावा त्यामुळे दलित चर्मकार पिडित कुटुंबाला योग्य तो न्याय मिळेल या मागणीसाठी राष्ट्रीय अनुसुचित आयोग दिल्लीचे सदस्य सुभाष पारधी यांना चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निवेदन देण्यात आले, निवेदन देतांना संघाचे प्रदेशध्यक्ष संजय खामकर ज्योती ताईं लिम्बोरे सुरेश पाटोळे चेतन भाऊ आदि उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button