Aurangabad

Breaking: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडी ची नोटीस..! आधी होते जळगांव येथे कार्यरत..!

Breaking: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडी ची नोटीस..! आधी होते जळगांव येथे कार्यरत..!
एकीकडे देशात विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठविल्यात जात असल्याच्या घटना घडत असताना अशातच आता छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (astik kumar pandey) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पंतप्रधान आवास घोटाळा प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय. पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी देखील ईडीकडून सांगण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा करण्यात आल्याचं आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात सुरवातीला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर याच प्रकरणात संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती. त्यानंतर ईडीने वेगवेगळ्या 9 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर महापालिका उपायुक्त आणि अधिकाऱ्यांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. आता तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. पाण्डेय आज मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे देखील समोर येत आहे.

आस्तिककुमार पाण्डेय यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार पहिला होता. त्यांची २०१७ मध्ये बदली झाली होती. आस्तिककुमार पांडेय हे 2011 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button