Pimpri

? मोठी बातमी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘ सेक्स ‘ रॅकेटचा पर्दाफाश…!5 तरुणींची सुटका..!

? मोठी बातमी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘ सेक्स ‘ रॅकेटचा पर्दाफाश…!5 तरुणींची सुटका..!

पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने पर्दाफाश केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.1) वाकड येथील दत्त मंदीर रोडवरील फॉरेव्हर स्पा झोन स्किन केअर येथे करण्यात आली. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन एका महिलेला अटक केली आहे.

ज्योती राहुल नायडु (वय-45 रा. साहील हाईट्स, पाचपीर चौक, काळेवाडी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर तीचे भागीदार विशाल पवनकुमार अग्रवाल (रा. मोहननगर, चिंचवड), आबासाहेब भाऊसाहेब तागड (रा. तागड हाऊस, अनंत पार्क, काटेपुरम चौकाजवळ, पिंपळे गुरव) यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 370, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील दत्त मंदीर रोडवरील ‘फॉरेव्हर स्पा झोन स्किन केअर’ या सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री करुन घेतली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा मारला. यामध्ये पाच तरुणींची सुटका केली. गुन्हा दाखल झालेले तिन्ही आरोपी भागीदारीमध्ये स्पा सेंटर चालवत होते.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस हवालदार प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, रोहिदास आडे, आदिनाथ मिसाळ, पोलीस नाईक तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो.गौस नदाफ, पोलिस शिपाई शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे अजिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, महिला पोलीस शिपाई माळी यांच्या पथकाने केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button