Pimpri

? Crime Dairy..लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

? Crime Dairy..लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

दत्ता पारेकर

पिंपरी लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 जुलै 2018 पासून 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत भाटनगर, काळेवाडी, शिरगाव आणि रावेत येथे घडला आहे. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसारअल्पेश हनुमंत कांबळे (वय 22, रा. भाटनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पेश याने पिडीत अल्पवयीन मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध ठेवले. तसेच आरोपीने 15 जुलै 2018 पासून 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत पिडीत मुलीला भाटनगर येथील राहत्या घरी, काळेवाडी, शिरगाव आणि रावेत येथील लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने पिडीत मुलीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button