Pandharpur

भटुंबरेचे खेडलेकर मठातील कोविड केअर सेंटर ठरतेय रुग्णांसाठी वरदान १७१ पैकी १३३ रुग्ण झाले बरे निसर्गरम्य वातावरणामुळे रुग्णांचे वाढतेय मनोबल

भटुंबरेचे खेडलेकर मठातील कोविड केअर सेंटर ठरतेय रुग्णांसाठी वरदान १७१ पैकी १३३ रुग्ण झाले बरे निसर्गरम्य वातावरणामुळे रुग्णांचे वाढतेय मनोबल
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर मागील महिन्याभरात एकीकडे कोविड सेंटर फुल्ल असल्याने कोरोना रुग्णांचे हाल होत असताना भव्य निसर्गरम्य परिसर व दोन दोन रुग्णांसाठी स्वतंत्र खोल्यांची सोय असल्याने तब्बल १३ गावातील १७१ रुग्णांना या कोविड सेंटरचा आधार मिळाला आहे.पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली या भागातील १३ गावांनी एकत्र येत स्वयंनिधीतून भटुंबरेहद्दीत अहिल्या चौकातील खेडलेकर महाराज मठात भाडेतत्वावर या कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे.०२ मे रोजी सुरू झालेल्या या सेंटरचा आजवर १७१ जणांना लाभ झाला असून यापैकी १३३ जण बरे होऊन घरी परतले असून ३८ जण अद्याप विलगिकरणात उपचार घेत आहेत.मागील पंधरवड्यात कोविड रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असताना या सेंटरमुळे ६५ एकरातील कोविड केअर सेंटरचा ताण कमी करण्यासाठी व रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी मोठी मदत झाली आहे.पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाच्या सहकार्यामुळे व १३ गावातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या सेंटरचा शेकडो रुग्णांना फायदा होत असल्याचे या भागातील लोकांनी सांगितले.
*१३ गावांच्या रुग्णांना मिळाला आधार*
भोसे,सुगाव भोसे,चिंचोली भोसे,खेडभोसे,देवडे, टाकळी पुनर्वसन,होळे,चिलाईवाडी,गुरसाळे,भटुंबरे, शेगांव,देगांव,नारायण चिंचोली इ.१३ गावातील रुग्णांना या कोविड सेंटरचा फायदा झाला आहे व अद्यापही होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button