Pimpri

?सोशल मीडियात हिट झालेली ती महिला पोलिस निलंबित

? सोशल मीडियात हिट झालेली ती महिला पोलिस निलंबित

पिंपरी : एका दुचाकीस्वार महिलेकडून लाच घेताना मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंद झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील एका महिला वाहतूक पोलिसाचा प्रताप तिच्या अंगलट आला आहे. काल सोशल मिडियात जोरदार व्हायरल झालेली ही क्लिप पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश यांच्यापर्यंत गेल्याने या महिलेच्या निलंबनाचे आदेश लगेचच काढण्यात आले. त्यामुळे पोलिस दलात आज खळबळ उडाली.
थेट हातात लाच न घेता लाच देणाऱ्याला ती सूचकपणे आपल्या खिशात ठेवायला सांगते. लाच स्वीकारणाऱ्या या पोलिसाचा व्हिडिओ ‘सरकारनामा’ने काल व्हायरल केला होता. तो आय़ुक्तांनी पाहिला.

दरम्यान, याप्रकरणी सहाय्यक पोलिस आय़ुक्त श्रीकांत दिसले यांनी ही महिला कर्तव्यात असलेल्या पिंपरी वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकांकडून अहवाल मागून घेतला होता.
त्याआधारे पोलिस उपायुक्तांनी तातडीने निलंबनाची कारवाई केली. स्वाती सोन्नर असे या महिला पोलिसांचे नाव आहे. शहराच्या बाजारपेठेत पिंपरी कॅम्पात नो एंट्रीत घुसलेल्या डबलसीट महिला दुचाकीस्वाराकडून डिजीटल पद्धतीने दंड आकारण्याऐवजी या महिला पोलिसाने सदर तरुणीला आपल्या पॅंन्टच्या मागील खिशात लाचेची रक्कम ठेवण्यास सांगून ती घेतली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button