Pimpri

?️ Big Breaking…पिंपरीत राडा, दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

पिंपरीत राडा, दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

दत्ता पारेकर

पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आनंद नगर झोपडपट्टीतील शेकडो नागरिक आज रस्त्यावर उरतल्यानं मोठा तणाव निर्माण झाला. जमलेल्या नागरिकांना घरात परतवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार आणि बळाचा वापर करावा लागला. ज्यामध्ये एक नागरिक किरकोळ जखमी झाला. त्यामुळे नागरिकांचा रागअनावर झाला आणि त्यांनी पोलिसांवर तुफान दगड फेक करत वाहनांची नासधूस केली आहे.

सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांची वस्ती असलेल्या आनंद नगर झोपडपट्टीमध्ये आतापर्यंत दिडशे पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्यानं हा परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करून प्रतिबंधित करण्यात आला होता. सुरवातीच्या काळात या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं. मात्र, मगापालिका प्रशासन केवळ आपल्याला डांबून ठेवत असून कोणत्याही सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करत या आधीही हे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button