Pune

? धक्कादायक…गागरगाव येथील बारा वर्षीय मुलीची आत्महत्त्या..

? धक्कादायक..गागरगाव येथील बारा वर्षीय मुलीची आत्महत्त्या..

प्रतिनिधी : दत्ता पारेकर पुणे

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गागरगावच्या हद्दीत असणा-या कदमवस्ती येथे रविवारी सकाळी अज्ञात कारणावरुन एका बारा वर्षीय मुलीने राहत्या घरात बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शिवनेरी नितिन गटकूळ असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव असून मुलीचे वडील नितिन राजाराम गटकुळ (वय ३५) रा. गागरगांव,कदमवस्ती) यांनी या संदर्भात इंंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

याबाबत इंदापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार दीपक पालके यांनी दिलेली माहिती अशी की नितिन गटकूळ हे बिजवडी येथील साखर कारखान्यामध्ये काट्यावर क्लार्क म्हणून नोकरी करतात.रविवार रोजी पहाटे चार वाजता गटकूळ आपल्या नोकरीच्या ठिकाणी गेले होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणा-या अर्जुन चव्हाण यांनी शिवनेरी हिने रहाते घरातील बाथरुममध्ये गळफास घेतला असल्याची भ्रमणध्वनीव्दारे माहिती दिली. तिला घेवून आपण इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात निघाल्याचे ही सांगितले. त्यानुसार गटकूळ तात्काळ रुग्णालयात पोहोचले. दरम्यान,डॉक्टरांनी शिवनेरी हिला तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button