Chalisgaon

दाता दे दान तो छुटे गिऱ्हाण…

दाता दे दान तो छुटे गिऱ्हाण…

मनोज भोसले

ग्रहण चंद्राचं असो की सूर्याचं काही काळासाठी का असेना काळोख होतोच.समोर अंधकार निर्माण होतो. एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकोळते. तसच काहीस ग्रहण सर्वच क्षेत्रात प्रत्येकाच्या जीवनात येत असत. काळी छटा दूर होवुन पुन्हा लख्ख प्रकाश सर्वत्र येतो.

असच काहीस ग्रहण चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील विकासाला लागलं आहे आहे का? असा प्रश्न पडतो. शहरातील रस्ते खड्यात गेले, घाणीच साम्राज्य पसरलाय, डेंग्यूचा कहर दरवर्षी झालाय. वाहतुक समस्येचे बळी रोजच जातं आहेत. अतिक्रमण चा विळखा अधिक घट्ट होतोय. गुन्हेगारी , वाळू, गुटखा याच ग्रहण कायम आहे.

ग्रहण हे कित्येक वर्षा नंतर अनुभवायला मिळते. पण तालुक्याच्या विकासाला कित्येक वर्षांपासून ग्रहण लागलाय. ते कधी सुटेल याची वाट प्रत्येक चाळीसगावकर पाहतोय.

एखाद्याने दुसऱ्याला झाकोळले तर ग्रहण लागते. नक्कीच तसच चाळीसगावकर आणि विकासाच्या मध्ये अशी अदृश्य शक्ती आलीय का? की ज्यामुळे विकासाला ग्रहण लागलाय. नक्कीच ही अदृश्य शक्ती म्हणजे “स्वार्थ” हीच असावी, हे स्पस्ट आहे.

विकासाच्या आड आलेला स्वार्थ बाजूला होऊन तालुका विकासाला लागलेलं हे ग्रहण बाजूला व्हावं. हीच अपेक्षा…..

शेवटी आपल्या खान्देशात एक म्हण आहे.” दाता दे दान तो छुटे गिऱ्हाण” तसच काहीस एखादा दाता विकासच दान देणार नाही तो पर्यंत तालुक्यातील विकासाचं ग्रहण सुटणार नाही. असच विकासच दान देणाऱ्या दात्याची आपण वाट पाहूया … तूर्तास एवढेच.

प्रफुल्ल साळुंखे
चाळीसगाव विकास मंच

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button