आटपाडी

रन फॉर युनिटीसाठी धावले आटपाडीकर

रन फॉर युनिटीसाठी धावले आटपाडीकर

राहुल खरात

रन फॉर युनिटी च्या निमित्ताने पहाटे आटपाडीकर एकत्रितरित्या धावले, तसेच त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचीही शपथ घेतली.भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनाचे..! राष्ट्रीय एकता दिनाचे आटपाडी मध्ये आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने घेण्यात आलेल्या रन फॉर युनिटी उपक्रमात आटपाडीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नेहरू युवा केंद्र सांगली व ,प्रशासन विभाग आटपाडीच्या वतीने सकाळी ७ वाजता राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन करण्यात आले.
या वेळी तहसीलदार मा.सचिन लंगुटे , सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे साहेब, सर्व प्रशासकीय कर्मचारी , सरपंच ,सौ.वृषाली पाटील, आटपाडी मधील सर्व डॉक्टर्स, सर्व प्रशासकीय कर्मचारी, प्रा.सदाशिव मोरे, नेहरू युवा केंद्र आटपाडी तालुका प्रतिनिधी राहुल नवले राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे, खेळाडू, विद्यार्थी, व नागरिक आदि. मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही दौड ग्रामपंचायत आटपाडी येथून सुरू होऊन पुढे ही दौड थिएटर चौक , साठेनगर चौक ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आल्यानंतर एकता दौडचा समारोप झाला , यावेळी तहसीलदार साहेब यांनी राष्ट्रीय एकता दौड चे महत्व विषद करून उपस्थितांना शुभेच्छांसह राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button