Akola

भारतीय ट्रायबल पार्टी अकोले तालुका प्रमुख पदी संकेत सामेरे यांची नियुक्ती

भारतीय ट्रायबल पार्टी अकोले तालुका प्रमुख पदी संकेत सामेरे यांची नियुक्ती

विठ्ठल खाडे

अकोले – भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मेगनाथ गवळी साहेब यांनी देवगाव गावामध्ये भेट दिली. त्यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या अडीअडचणी समजून घेतल्या. ससाणे सर यांनी आदिवासी समाजाची थोडक्यात जनजागृती केली. त्याच बरोबर आदिवासी समाजाविषयी इतिहास पटवून सांगितला. त्याच बरोबर कोरोना सारख्या महामारीला घाबरून जाऊ नहे असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेश अध्यक्ष मेघनाद गवळी सर म्हणाले आदिवासी समाज हा फार पूर्वी पासून इथे वास्तव्य करून रहातो आहे. आजपर्यँत आदिवासी हा डोंगर दऱ्यात राहून शेती करत आहे. आज आपल्या देशाला स्वतंत्र मिळून दीडशे वर्षे झाली आहेत. परंतु अजून पर्यंत आदिवासी हा मोलमंजुरी करण्यासाठी अकोल्यापासून नारायणगाव सारख्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे आदिवासी समाजाने एक झाले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. प्रत्येक आदिवासी तरुणाने राजकारणात येऊन आपल्या गावचे तालुक्याचे चित्र बदलले पाहिजे. यानंतर भारतीय ट्रायबल पार्टी विषयी माहिती सांगितली. हा पक्ष आदिवासी न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे असे हि ते म्हणाले यानंतर भारतीय ट्रायबल पार्टी तालुका प्रमुख पदी संकेत सामेरे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मेघनाद गवळी सर प्रदेश अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य )ज्ञानेश्वर माळेकर, पवार ससाणे, घुमंडे, बाळू मुठे, डंबाळे, वसावी, मोहन गभाले, अमोल भांगरे, बाळू भांगरे, कैलास भांगरे सचिन भांगरे उपस्थित होते. भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रदेश अध्यक्ष यांनी राष्ट्र्पती पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे यांच्या बिज बियाणे बॅंकेला भेट देण्यात आली.
——————————————–

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button