Pune

Mollywood: आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरील ऐतिहासिक चित्रपटाची जुन्नर येथे घोषणा

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरील ऐतिहासिक चित्रपटाची जुन्नर येथे घोषणा

जुन्न्नर येथे 26जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हॉटेल साईश येथे चतुर्थी फिल्म्स द्वारा प्रस्तुती निर्माता निर्देशक गितकार रमेश अल्लाट यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनावर बनविण्यात येणाऱ्या ऐतिहासिक राघोजी भांगरे टायगर ऑफ द डेक्कन चित्रपटाची घोषणा करण्यात आली. रमेश अल्हाट हे गेली पंचवीस वर्षे मराठी चित्रपट सृष्टीत कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी तीन मराठी चित्रपट निर्माण केले असून सध्या त्यांचा कॉलेजचे नॉलेज हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे अशा अनुभवी निर्माता दिग्दर्शक यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनावरील ऐतिहासिक चित्रपटाच्या घोषणेच्या कार्यक्रमाच्या सत्कार प्रसंगी चित्रपटातील मुख्य कलाकार राघोजींची भूमिका साकारणारे मयुरेश महाजन ,नायिका 2019ची मिस इंडिया अनन्या शिंदे ,सह निर्देशक कृष्णा वैदंडे तसेच सहकलाकार मंदार चौधरी ,राजेंद्र शिंदे ,फर्जंद फेम अमोल इ.कलाकारांसह सह्याद्री तील आदिवासी सामाजिक संघटनांसोबत जुन्नर मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती हा ऐतिहासिक चित्रपट असल्याने कोणताही सामाजिक आक्षेप येऊ नये यासाठीहि आदिवासी विचार मंच महाराष्ट्र ,बिरसा ब्रिगेड व अन्य संघटनांसोबत बैठक करण्यात आली राघोजी भांगरे यांचा कार्यकाळ 1805ते 1848 त्यांना ठाणे येथील सेंट्रल जेल मध्ये फासी देण्यात आली सह्याद्री मध्ये शिवाजी राजां नंतर चा खूप मोठा योद्धा ज्याने इंग्रजांना जेरीस आणले होते अनेक लहान मोठ्या लढाया जुन्नर मधील मोठी लढाई भीमाशंकर ची मोठी इंग्रजांबरोबर ची समोरासमोर लढाई अशा अनेक लढाया परंतु हा क्रांतिकारक इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षीत राहिला हा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून देशासमोर येण्यासाठी हिंदीमध्ये या चित्रपटाची निर्मिती होत आहे राघोजींचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रा पुरते मर्यादित नसून मध्यप्रदेश गुजरात दादरा नगर हवेली पर्यंत होते जुन्नर येथे सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी आदिवासी विचार मंच चे कार्यकर्ते राजेश डामसे,प्रदीप पारधी ,कैलास सुपे ,नवनाथ लहांगे ,अड यशवंत पारधी ,सोमनाथ मुऱ्हे तर बिरसा ब्रिगेड चे अध्यक्ष काशिनाथ कोरडे कार्याध्यक्ष डॉ विनोद केदारी शुभम भवारी ,शिवाजी मडके अंकुश असवले उपस्थित होते. चित्रपटाचे नाव *राघोजी भांगरे टायगर ऑफ द डेक्कन* असे नाव जाहीर करण्यात आले पुढील महिन्यात चित्रपटाच्या शूटिंग चा शुभारंभ होणार असल्याचे अल्लाट यांनी सांगितले तर चित्रपटाच्या सर्व टीमचे आदिवासी समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन उंडे यांनी केले तर आभार माउली दाभाडे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button