Amalner

अटकाव दिनदर्शिका प्रकाशन आणि सत्कार सोहळा

अटकाव दिनदर्शिका प्रकाशन आणि सत्कार सोहळा

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : अमळनेर दि २९/१२/२०२० रोजी सकाळी ११ वाजता बडगुजर समाज मंगल कार्यालय शिरूड नाका येथे सण २०२१ च्या अटकाव दिनदर्शिका चे प्रकाशन ताईसो सौ तिलोत्तमा पाटील (संचालिका JDCC बँक जळगाव) यांच्या हस्ते आणि प्रा – मनोहर बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली बडगुजर समाजातील व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री प्रवीण पुंडलिक बडगुजर श्री योगराज रामदास शेठ श्री भास्कर राव गिरनार श्री राजाराम शेठ श्री रामदास शेठ श्री आर.डी.चौहान आर.डी. मांडळकर श्री सुनील जाधव साहेब तसेच सौ वसुंधरा लांडगे(विषवस्त खा.शि. मंडळ व संचालक अर्बन बँक) सौ ताईसो योजना पाटील(राष्ट्रवादी म.ता.अध्यक्ष) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपादक श्री जगन्नाथ बडगुजर श्री हितेंद्र बडगुजर (सहसंपादक)श्री योगेश पाने (प्रतिनिधी) श्री किरण जाधव (प्रतिनिधी) यांनी आयोजित केला असता बडगुजर समाजाचे शिरपेचात तुरा रोहणार्या कुमारी सायली बडगुजर (आंतराष्ट्रीयआट्या पाट्या खेळाडु) आणि कुमारी दहावीत ९६% गुण मिळवणारी कुमारी जागृती महेंद्र बडगुजर यांचा ही सत्कार करण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरांनी अन्याय अत्याचार विरोधात उभे राहणारे संपादक जगन्नाथ बडगुजर यांच्या वृत्तपत्राला अटकाव हे नाव सार्थ आहे अशी ओळख करून दिली आणि अटकाव दिनदर्शिका संपादक मंडळाचे सर्वांनी हार्दिक कौतुक करून आभार मानले विशेष म्हणजे कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचा सत्कार करण्यात आला…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button