आटपाडी

अनिल भाऊ बाबर पुन्हा आमदार !

अनिल भाऊ बाबर पुन्हा आमदार !

राहुल खरात
आटपाडी खानापूर विधानसभा निवडणुकीत लोकप्रिय आमदार म्हणून अनिल भाऊ बाबर यांना जनतेने कौल दिला आहे ! आमदार अनिल भाऊ बाबर हे 26996 मताधिक्याने विजयी झाले आहेत !
आटपाडी चे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी 12 वी फेरी नंतर आमदार अनिल भाऊ बाबर यांचा विजयी उत्सवास आटपाडी बाजार पटांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळास पुष्पहार अर्पण करून जल्लोषत सुरवात केली !
आटपाडी खानापूर मतदार संघाचे आमदार यांच्या विजया बदल पत्रकार सतीश भिंगे व खानापूर तालुक्यातील पत्रकार यांनी अभिनंदन केले !
आटपाडी खानापूर विधानसभा मतदार संघाचे स्व, संपतरावनाना माने यांच्या नंतर 4 वेळा आमदार होण्याचा बहुमान अनिल भाऊ बाबर यांना मिळाला आहे !
सांगली जिल्हा खासदार संजय काका पाटील यांनी अभिनंदन केले आहे !
आटपाडी खानापूर मतदार संघात मोठ्या उत्साहाने विजयी साजरा करण्यात आला आहे ! आमदार राजेंद्र आण्णा देशमुख तानाजीराव पाटील सोबतच होते !
आमदार अनिल भाऊ बाबर यांची 26996 मताधिक्य मिळवून पुन्हा आमदार म्हणून निवड झाल्या बदल तालुक्यातील जनतेने अभिनंदन केले आहे !
विटा येथे मिरवणूक काढण्यात आली होती !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button