Amalner

?️अमळनेर कट्टा…अमळनेर तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे काळ्या फिती लावून काम करत निषेध आंदोलन सुरू… तालुका आरोग्य विभागाला दिले प्रलंबित मागण्यांचे निवेदन..

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे काळ्या फिती लावून काम करत निषेध आंदोलन सुरू…तालुका आरोग्य विभागाला दिले प्रलंबित मागण्यांचे निवेदन..

अमळनेर : राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि ०४ हजार गटप्रवर्तक गेल्या १० ते १२ वर्षांपासून कार्यरत आहेत.आशा स्वयंसेविकांना सुमारे ८० पेक्षा जास्त विविध प्रकारची कामे करावी लागतात.त्याबदल्यात त्यांना कामानुसार मोबदला अदा केला जातो तर गटप्रवर्तकांना दरमहा प्रवासभत्ता म्हणून ७५००/- ते ८२००/- रूपये अदा केले जातात.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमुळे घराघरांत आरोग्य सेवा पोहचली.शिवाय कोरोनाच्या महामारीत जिवाची पर्वा न करता शासनाच्या तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनासंबंधित सर्व कामे आघाडीने करीत आहेत.
असे असतांनाही शासन त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे म्हणून आशाताई आणि गटप्रवर्तकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांननी मागण्या मान्य होईपर्यंत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे.सदर आंदोलनात अमळनेर तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी १०० टक्के भागीदारी केली आहे.

१) आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक आठवड्याभर दररोज आठ तासांपेक्षा जास्त काम करत असून त्यांचे काम अत्यंत आवश्यक असल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यात यावे.

२) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाशर्ती लागू करेपर्यंत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना किमान वेतनाइतके वेतन देण्यात यावे

३)आशा स्वयंसेविका नियमित कर्मचारी नसल्याने त्यांना रॅपिड ॶॅंटिजेन चाचणी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये.

४) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी भाऊबीज भेट देण्यात यावी.

५) कोरोनाने बाधित होऊन म्रुत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांचा लाभ देण्यात यावा.

६)दि.१७ जुलै २०२० रोजीच्या शासन आदेशानुसार दरमहा मानधनवाढ लागू करण्यात यावी.

७) आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना कामकाज करण्यासाठी मोबाईल व लॅपटॉप पुरविण्यात यावेत.

८) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सादिल(स्टेशनरी) खर्च आणि मोबाईल रिचार्जची रक्कम वाढविण्यात यावी तसेच गणवेशासाठी १२००/- ऐवजी २०००/-रुपये करण्यात यावे.

९)आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून त्यांना दरमहा पेन्शन लागू करण्यात यावे.

१०)आशा स्वयंसेविकांना कामाचा थकीत मोबदला तात्काळ अदा करून यापुढे दरमहा वेळेवर अदा करण्यात यावा.

११)आशा स्वयंसेविकांना दारिद्र्य रेषेखालील आणि वरील असा भेदभाव न करता कामाचा सरसकट मोबदला अदा करण्यात यावा.

सदर आंदोलनात अमळनेर तालुक्यातील आणि शहरातील सुमारे तिनशे पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाले आहेत.आंदोलनाच्या धर्तीवर प्रलंबित मागण्यांचे निवेदन संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर,यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील,यांच्या नेतृत्वाखाली आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीष गोसावी आणि नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन यांना शिष्टमंडळाने सादर केले.शिष्टमंडळात सुनंदा पाटील,कविता बोरसे,भारती पाटील,तस्लिमबी, प्रगती घाणेकर,अनिता महाले, प्रतिभा कोळी,चित्रा पाटील,सिमा बाविस्कर,शितल बोरसे, रुपाली पाटील, दिपाली भावसार, रेखा पवार यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी भागिदारी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button