Maharashtra

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजीत चर्चासत्र संपन्न …!

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजीत चर्चासत्र संपन्न …!

राहुल खरात

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्च्या विद्यमाने मंगळवार दिनांक १२ नोव्हेबर, २०१९ रोजी महामंडळाच्या मुंबई कार्यालयांत महाराष्ट्र अध्यक्ष मा.बाळासाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मराठी चित्रपट निर्माते यांच्या चित्रपट वितरणसाठी महामंडळ सदैव प्रयत्नशील राहील. त्याचबरोबर मराठी सिनेमाना मल्टिप्लेक्स मध्ये प्राईम टाइम मिळवून देणे तसेच चित्रपट प्रदर्शित करण्याकरिता कमीत कमी सात दिवस आधी चित्रपटाचा शो आणि थिएटर यांची माहिती निर्मात्यांना मिळाली पाहिजे. चित्रपटाचे ट्रेलर दाखवली जात नाहीत किंवा चित्रपटाचे ट्रेलर थिएटर मध्ये दाखविण्यासाठी पैसे आकारले जातात ही चुकीची प्रथा त्वरित बंद करण्यात यावी यासाठी निर्माता महामंडळ मल्टिप्लेक्स आणि डिजिटल प्लेटफार्म यांचेशी चर्चा करणार आहेत. याकरिता निर्माता यांनीही आपले मत निर्माता महामंडळ कडे मांडावेत असे अवाहन केले आहे. महापूराच्या
नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात शेती आणि व्यवसाय यांचे नुकसान झाले त्याकरिता महाराष्ट्र शासन आर्थिक सहकार्य करतच आहे पण या नैसर्गिक आपत्ती मध्ये चित्रपट निर्माता यांचेही आर्थिक नुकसान झाले असून त्यांनाही शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निर्माता महामंडळ करणार आहे. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत महामंडळाचा प्रसार करणे, मराठी निर्मात्यांच्या समस्यांचे निवारण करणे अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा झाली.याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक , पत्रकार मा.गुरुनाथ तिरपणकर यांची “ठाणे -बदलापूर प्रसिद्धी प्रमुख” तर श्रीमती प्रमिला पांचाळ यांची “महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक” म्हणुन सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्री देवेंद्र मोरे , उपाध्यक्ष श्री मुरलीधर दीक्षित, खजिनदार प्रसन्न नागावकर, दिग्दर्शक श्री प्रविण भगत , सह खजिनदार श्री राजेंद्र बोडारे , महा. सचिव श्री सुभाष कांबळे, दिग्दर्शक -पत्रकार महेश्वर तेटांबे , अभिनेते सुरेश डाळे-पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्षा मेघाताई डोळस, श्री किशोर केदारजी, श्री रमेश साळवे, श्री सतीश माने, श्री विनोद डवरे, श्री भारत जगताप, श्री अशोक दुस्तकर, श्री राजू पंडित शेवाळे आदी महामंडळाचे मान्यवर सदस्य उपस्थित होते…!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button