चंद्रपूर

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाळीव प्राण्यावर बिमारीचे सावट…

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाळीव प्राण्यावर बिमारीचे सावट…
परिसरातील 15 गावांमधील लसीकरणाची झालेले नाही….

ज्ञानेश्वर जुमनाके

शंकरपूर………….

हा परिसर ग्रामीण भाग असून शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करतात शेतीला पूरक म्हणून शेतकरी पाळीव प्राणी पाळत असतात, त्यामध्ये दूध देणाऱ्या गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्या हे एक उद्योगाचे माध्यम ग्रामीण भागात बनलेले आहे व दूध व्यवसाय सुद्धा आहे मात्र तालुक्यात हे गाव मोठे असून याठिकाणी पशुवैद्यकीय श्रेणी एक चे पशु चिकित्सालय आहे. व या पशुचिकित्सालय 15 गावे येत असून यामध्ये हिरापूर, आंबोली, किटाडी, शंकरपुर, ईरवा ,झरी, दहेगाव,खैरी, चकजाटेपार, चक लोहारा, डोंगरगाव, आसोला, आजगाव, पाचगाव ही गावे जोडलेली असून याठिकाणी तोंडखुरी, पायखुरी, घटसर्प, पिपिआर, या बिमारी चे लसीकरण घेणे अनिवार्य असतानासुद्धा अजून पर्यंत डॉक्टरच्या दुर्लक्षामुळे लसीकरण झालेली नाही त्यामुळे पाळीव प्राण्यावर बिमारीचे सावट निर्माण झालेले आहे…
तसेच जनावरे रात्रीकालीन बिमार पडल्यामुडे खाजगी व्यक्तीला उपचारासाठी बोलवावे लागते त्यामुळे पाळीव प्राणी मालकाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे..
तसेच या गावांचे अंतर तीन ते पाच किलोमीटर असल्यामुळे परिसरातील पाळीव प्राणी मालकाला दवाखान्यात नेणे शक्य नाही. म्हणून आपल्या जनावरांचा इलाज कसा करावयाचा असा प्रश्न येथील येथिल शेतकरी व पशु मालकांना पडला आहे.
शेतीला जोड़ व्यवसाय म्हणून अनेकांनी दुग्ध व्यवसाय करणे सुरू केले आहे, अनेकांनी दुधाळू जनावरे पोसलेली आहेत. यावर्षी अति पावसामुळे अनेक साथीचे रोग जनावरांवर पसरले आहेत, आज पर्यंत या गावात एकही लसिकरण शिबिर झालेले नाही….
त्यामुडे आतातरी शासन व संबधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन आमची समस्या सोडवावी असी मागणी पाळीव जनावर शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button