Amalner

नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराने अखेर घेतला विद्यार्थिनीचा जीव

नगरपरिषदेच्या “अस्वच्छ”कारभाराने अखेर घेतला विद्यार्थिनीचा जीव 
अस्वच्छ कारभाराचा बळी…???

नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराने अखेर घेतला विद्यार्थिनीचा जीव

अमळनेर 
येथील 
   हेमंत सोनार यांची कन्या कू मानसी हेमंत सोनार वय १२ वर्ष हिचा काल सायंकाळी साडेचार वा. डेंग्यूच्या आजाराने निधन झाले. या विद्यार्थिनीला काही दिवसा पूर्वी डेंग्यूची लागण झाली होती.तिच्यावर डॉ अक्षय कूळकर्णी यांच्याकडे प्राथमिक ऊपचार सूरू होते पूढील उपचाराकरिता तिला नासिक येथील ओकहार्ट रुग्णालयात उपचार सूरू होते.मात्र उपचारा दरम्यान तिचा मुत्यु झाला. तिच्या अचानक मुत्यु झाल्याने तिच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला सुखी संसारातील गुणी मुलीच्या अश्या अचानक जाण्याने सोनार कुटुंबीय शोकसागरात बुडाला आहे.
आणि नगरपरिषदेच्या हलगर्जीपणा मुळे एका मुलीला जीव गमवावा लागला आहे.

नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराने अखेर घेतला विद्यार्थिनीचा जीव

येथील नगरपरिषदेचा सर्वच बाबतीत अस्वच्छ कारभार अमळनेर शहरातील नागरिकांना ज्ञात आहे.शहरात प्रचंड घाण,कचरा,अस्वच्छता असून संपूर्ण शहर रोगराईचे माहेरघर बनले आहे. नागरिक वारंवार तक्रार करतात परंतु तक्रार करणारा लगेच नगरपरिषदेतील अधिकारी,कर्मचारी यांच्या दृष्टीने वाईट ठरतो.म्हणजे नागरिकांनी कर भरावा आणि सुविधांची मागणी देखील नगरपरिषदेकडे करू नये.महाराष्ट्र मराठी 7 ने सातत्याने या अस्वच्छ कारभाराचा पाठपुरावा केला आहे.  

नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराने अखेर घेतला विद्यार्थिनीचा जीव
अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि लोक प्रतिनिधी यांनी शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.
सम्पूर्ण वर्ष भरात एकदाही जन्तु कीटकनाशके फवारणी करण्यात आलेली नाही. स्वच्छ भारत,स्वच्छ अमळनेर चा नारा घेऊन उतरलेले लोक प्रतिनिधी कुठे गायब झाले काही कळत नाही. गटारी काढण्यासाठी,रस्ते झाडण्यासाठी,फवारणी करण्यासाठी विनंती करावी लागते तेंव्हा कुठे नगरपरिषदेचे कर्मचारी साफ सफाई ला येतात.त्यांची ड्युटी किंवा कर्तव्य म्हणून साफ सफाई केली जात नाही.यामुळेच शहराला डेंग्यू सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
शेवटी डेंग्यू चा एक बळी घेऊनच कदाचित नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांना जाग येईल .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button