Aurangabad

पोखरा योजनेत गावे समाविष्ठ करण्याची अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेची मागणी कृषीमंत्री ना .दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्धारे केली मागणी

पोखरा योजनेत गावे समाविष्ठ करण्याची अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेची मागणी कृषीमंत्री ना .दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्धारे केली मागणी

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना वैजापुर तालुका अध्यक्ष किशोर पाटील मगर यांनी वैजापुर तालुक्यातील डोंगरथडी भागातील लोणी ( खुर्द ) पराळा चिकटगाव, वडजी ,, चितरखेडा ,खरज ,इत्यादी गावे या पोखरा योजनेपासुन वचिंत आहे. या गावात अनेक गोरगरिब अल्प भुधारक शेतकरी आहे ज्यांची जेमतेम शेत जमीन असुन त्यांचा उदनि॔वाह यावरच भागविला जातो म्हणून या गावांना पोखरा योजनेमध्ये सामाविष्ठ केले तर या गावातील शेतकर्‍यांना कृषीविभागाच्या व राज्य शासनाच्या शेतकरी योजनेचा लाभ मिळेल.

त्या योजनेत कांदाचाळ जर समाविष्ठ केली तर त्याचा शेतकरयांना कांदा साठवणीसाठी फायदा होईल आशी मागणी कृषीमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्धारे करण्यात आली आहे. तसेच मा कृषीमंत्री यानी आमच्या निवेदनाचा सहनाभुती पुर्वक विचार करावा व या गावांना पोखरा योजनेत अंतर्गत समाविष्ठ करावे असे किशोर पाटील मगर यांनी सागितले

संबंधित लेख

Back to top button