Maharashtra

उत्कृष्ट नियोजनातून पाचोरा भाजपासह शिंदे मंडळाचा जिल्ह्यात आदर् गरजूंना घरपोच धान्य वाटप

उत्कृष्ट नियोजनातून पाचोरा भाजपासह शिंदे मंडळाचा जिल्ह्यात आदर्
गरजूंना घरपोच धान्य वाटपाचा कृतिशील उपक्रम

प्रतिनिधी नितीन माळी

पाचोरा व भडगाव भारतीय जनता पार्टी परिवार तसेच कै. परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या लोकसभा मतदारसंघात युवा नेता अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्फत पाचोरा व भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील आर्थिक व दुर्बल घटकातील गरजूंना घरपोच धान्य वाटपाची सुरुवात करण्यात आली. घरातच राहून कोरोना आजाराशी मुकाबला करताना शेकडो परिवारांना मदतीची गरज आहे.अशा गरजू परिवारांना घरपोच अन्नधान्य देण्याच्या या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज केला. यावेळी पाचोरा कृ.उ.बा.समिती सभापती सतिषबापू शिंदे ,भाजपाचे पाचोरा शहराध्यक्ष रमेश वाणी,भाजपा तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलालकाका जैन,शहर सरचिटणीस दिपक माने,राजेशभाऊ संचेती उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button