चिमूर,चंद्रपूर

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदित्य पाटिल चे सुयश

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदित्य पाटिल चे सुयश

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

पंचायत समिती चिमुर तर्फे 45 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे भिवाजी वरभे विद्यालय बोथली ( वा.) येथे नुकतेच आयोजन करण्यात आले . या प्रदर्शनी मध्ये सरस्वती कन्या विद्यालय नेरी येथील आदित्य राजू पाटिल ( वर्ग 7 वा)याच्या मॉडल ला गैर आदिवासी उच्च प्राथमिक गटातुन तृतीय क्रमांक प्राप्त झाला . तसेच वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सदर विद्यार्थयाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी करीता निवड झालेली आहे . आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक शैलेश वाघे मुख्याध्यापिका कु. ए. ए. अटाळकर , शिक्षकवृन्द तसेच आई- वडिलांना दिले . ग्रामीण भागातील विद्यार्थयाने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
बोथली येथील विज्ञान प्रदर्शनी मधील बक्षीस वितरण पस सदस्य अजहर शेख ,गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button