ब्राम्हणशेवगे येथे कोरोना संसर्ग जनजागृती समिती ची बैठक संपन्न
प्रतिनिधी स्वपनिल माले
येथील कोरोना च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे स्थापित कोरोना संसर्ग जनजागृती समिती ची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ब्राम्हणशेवगे येथील किराणा दुकानातून सोशल डिस्टन्सनचे उल्लंघन होणार नाही. किराणा दुकानातून गुटका,तंबाखू,गावठी दारूचे साहित्य विक्री करण्यात येऊ नये.बाहेरच्या गावातील लोकांना कुठल्याही प्रकारे गावात प्रवेश करू देऊ नये याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यापुढे आपल्या गावातील बाहेर गावी गेलेले नागरिकांना लाकडाऊन कालावधीत गावात येता येणार नाही तशी आपल्या नातेवाईकांनी दक्षता घ्यावी. तसेच आपल्या गावातील गरीब कुटुंबाना,रेषण कार्ड नसलेल्या नागरिकांनाही प्रधानमंत्री योजना अंतर्गतचा तादूल मिळेल यासाठी गावातील काही दानशुर लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले. तसेच संचारबंदी काळात अजूनही काही लोक बाहेर गावाहून बांधकामासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बाधकाम करत असलेल्या नागरिकांना काम तात्काळ बंद करण्याबाबत नोटीसा देण्याचे ठरले.सोशल डिस्टन्सन चे नियम पाळून सभा संपन्न झाली. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच आशा माळी,उपसरपंच रेखाबाई चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य शांताराम नेरकर, दत्तात्रय पवार,तंटामुक्त समिती अध्यक्ष मदन राठोड,पोलीस पाटील राजेंद्र माळी,रत्नाकर पाटील,पिना दाभाडे,वासुदेव जाधव,ग्रामसेवक शैलेश पाटील,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.






