पंढरपूर

पाकिस्तान व बांगला देशातून होणारी घुसखोरी थांबली पाहिजे भाजपाचे अविनाश कोळी

पाकिस्तान व बांगला देशातून होणारी घुसखोरी थांबली पाहिजे भाजपाचे अविनाश कोळी

रफिक अतार

भाजपाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी यांची स्वेरीला सदिच्छा भेट

पंढरपूर– ‘भारताच्या सीमारेषेजवळील असलेल्या पाकिस्तान व बांगलादेश या देशातील नागरिकांची भारतात होणाऱ्या घुसखोरीमुळे भारतात लूटमार, खून, बलात्कार अशा गंभीर स्वरूपातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. घुसखोरीमुळे भारतीय नागरिकांचे जीवन अवघड होत आहे. यासाठी घुसखोरीवर योग्य उपाय करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन भाजपाचे तुळजापूर येथील महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी यांनी केले.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला सदिच्छा भेटीच्या निमित्ताने भाजपाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी हे आले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण स्वेरी कॅम्पसला भेट दिल्यानंतर आपली भावना व्यक्त करत होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या वाटचाली बद्धल माहिती दिली. अविनाश कोळी हे भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असून ते भाजपचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांचे सामाजिक कार्य भारताच्या उत्तर पूर्व भागामध्ये म्हणजेच आसाम, मेघालय, मिझोरम, नागालँड इ. ठिकाणी फार मोठे आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याची वीस ते तीस वर्षे त्या भागात सामाजिक कार्य करण्यात घालविलेली आहेत. तेथील जनजीवन व त्या भागातील भारतीय लोकांच्या अडीअडचणी यांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे व अडीअडचणी वर मात करण्यासाठी विविध उपाय योजना काय असाव्यात याचा ऊहापोह ते सरकार बरोबर करत असतात. त्या भागातील अडचणीबद्दल सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, ‘भारतातील उत्तर पूर्व राज्यांमध्ये ४० ते ४५ लाख बांगला देशामधील नागरिकांनी घुसखोरी केलेली आहे. यासाठी अशा घुसखोरींना शोधणे व त्यांना मायदेशी पाठविणे यासाठी मोहीम सुरु केली पाहिजे.’ असे सांगितले. यावेळी त्यांनी नागा लोक व त्यांचे सध्याचे प्रश्न यांच्यावर सखोल चर्चा केली. भारतीय प्रशासनाने यावर लक्ष घालून ते प्रश्न सोडवावेत. तेथील लोकांचे प्रश्न समजून घेणे आणि ते सरकारपर्यंत पोहोचणे आणि त्यावर तोडगा काढणे ही प्रक्रिया सुरू आहे. तसेच महाराष्ट्रातील नागरिकांची कष्ठ करण्याची मानसिकता व इच्छा कमी असल्यामुळे बांगलादेशी नागरिक भारतात रोजगाराच्या निमित्ताने येतात व भारतातच स्थायिक होत आहेत. दुर्गम भागातील लोकांची व्यथा भारतातील सधन भागातील प्रत्येक नागरिकाने ऐकली पाहिजे व अनुभवली पाहिजे.’ असे सांगून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सॅल्युट करण्यासारखे आहे.’ असेही मत त्यांनी व्यक्त केले. तसेच देशातील विविध भाषांमुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात एकच भाषा असावी. जगभरात नोकऱ्यांसाठी गेलेल्या भारतीय लोकांसाठी भारत ही त्यांची मातृभूमी आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी भारत भूमी सदैव तयार आहे. तसेच त्यांनी आसाम स्टुडंट असोसिएशन, बोडो आंदोलन यावरही प्रकाश टाकला व अशी आंदोलने का सुरु झाली व त्यांच्या मागण्या आणि त्यावरील उपाय याबद्दल चर्चा केली.यावेळी त्यांच्या समवेत नागेश अधटराव,समाधान गायकवाड व त्यांचे सहकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, अभियांत्रिकी प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

पाकिस्तान व बांगला देशातून होणारी घुसखोरी थांबली पाहिजे भाजपाचे अविनाश कोळीछायाचित्र– स्वेरीला भाजपाचे तुळजापूर येथील महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांचे स्वागत करताना स्वेरीचे संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सोबत डावीकडून नागेश अधटराव, शैक्षणिक अधिष्ठाता सिव्हील इंजिनिअरिंग चे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, अभियांत्रिकी प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, डॉ.व्ही.एस.क्षीरसागर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button