Pune

बोरगाव घटनेच्या निषेधार्थ इंदापूर तहसील कार्यालयासमोर मातंग एकता आंदोलन संघटनेचा आक्रोश मोर्चा

बोरगाव घटनेच्या निषेधार्थ इंदापूर तहसील कार्यालयासमोर मातंग एकता आंदोलन संघटनेचा आक्रोश मोर्चा

दत्ता पारेकर पुणे

पुणे : माळशिरस तालुक्यातील मौजे बोरगाव (माळेवाडी) येथील मयत धनाजी आनंता साठे यांच्या अंत्यविधी वरून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दि.30 रोजी इंदापूर तहसील कार्यालय या ठिकाणी मातंग एकता आंदोलन इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष आरडे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी व त्यांना पाठीशी घालणारे पोलीस प्रशासन यांच्यावर जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी ही मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.सदर मागणीचे लेखी निवेदन नायब तहसीलदार इंदापूर श्री.अनिल ठोंबरे यांना देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे,सोलापूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे,मातंग एकता आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती राहूल आरडे, लहुजी शक्तिओ सेना इंदापूर तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, बहुजन ब्रिगेड महासंघ संस्थापक अध्यक्ष संदीप मोहिते,राहुल आरडे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष अभिजित बागव,अभिजित बागव, अनिल गवळी,रेखा खिलारे,अमोल आरडे,कुमार साठे,विजय आरडे,धनंजय आरडे,भगवान मोरे,अमित मोरे, यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव येथील माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे दिनांक 20 ऑगस्ट रोजी 2 वाजता निधन झाले होते. परंतु गावातील जातीयवादी गुंडप्रवृत्तीच्या समाजकंटकांनी त्यांचा अंत्यविधी स्मशान भुमीत करण्यास विरोध करुन अंत्यविधी करु दिला नाही.सदर माळशिरस तालुक्यात झालेल्या या संतापजनक घटनेचा सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर निषेध व्यक्त होत आहे.

यावेळी राहुल आरडे म्हणाले की,आरोपींना तात्काळ अटक झाली पाहीजे, अकलूज येथील पोलिस प्रशासनावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.तसे न झाल्यास भविष्यात आघाडीच्या वतीने रास्ता रोको, उपोषण,धरणे आंदोलन करण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button