Jalana

जिल्ह्यातील 20 ग्रामीण रुग्णालयांना मिळणार स्वतंत्र रुग्णवाहिका

जिल्ह्यातील 20 ग्रामीण रुग्णालयांना मिळणार स्वतंत्र रुग्णवाहिका
जालना : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे 108 क्रमांकाच्या सर्व रुग्णवाहिका व्यस्त असल्याने इतर रुग्णांची तारांबळ होत आहे. अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाहीत.
तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद आहे. त्यामुळे अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. या बाबीची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने जालना जिल्ह्यासाठी 20 रुग्णवाहिका मंजूर केल्या होत्या.
त्या सर्व रुग्णवाहिका आज शुक्रवारी जालना शहरात दाखल होत असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.गेल्या काही महिन्यांपासून जालना शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील 108 क्रमांकाच्या सर्व रुग्णवाहिका या कोरोना रुग्णांसाठी व्यस्त झाल्या आहेत.
तसेच शासनाने कोरोना रुग्णांची ने आण करण्यासाठी बाहेरून काही भाडेतत्त्वावर वाहने देखील लावली होती. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अनेक प्राथमिक केंद्रात येणाऱ्या रुग्णांना जिल्ह्याच्या रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यासाठी रुग्णवाहिका कमी पडत होत्या.
या गोष्टीची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यासाठी 20 रुग्णवाहिका मंजूर केल्या होत्या. या सर्व रुग्णवाहिका आज जालना जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button