फैजपूर पोलिसांकडून आरोपीने फूस लावून बळजबरीने पळविलेल्या मुली सह संशयित आरोपी ताब्यात
सलीम पिंजारी
विषय :- फैजपुर पोलीस स्टेशन भाग -५ गु र न . ९१/२०१९ भा .द.वि.क.३६३
दिनांक :- २८/१२/२०१९ रोजी सकाळी ०७:०० वा.चे सुमारास फिर्यादी यांची मुलगी वय १६ वर्षे रा. फैजपुर ता. यावल हीस शाळेत जात असतांना रस्त्याने फैजपुर शहरातुन कोठुन तरी सद्दाम बाबू तडवी रा ईस्लामपुरा, ३ नं. उर्दु शाळे समोर, ईदगाह जवळ, फैजपुर ता. यावल याने कोणत्यातरी अज्ञात उद्देशाने फुस लावुन बळजबरीने त्यांचे व त्यांचे कुटुंबियाचे कायदेशिर रखवालीतुन पळवुन नेली होती म्हणुन त्या अनुषंगाने फैजपुर पोलीस स्टेशन भाग -५ गु र न . ९१/२०१९ भा .द.वि.क.३६३ गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ . श्री . पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, व SDPO श्री . नरेन्द्र पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . बापू रोहम व फैजपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रकाश वानखेडे यांना सूचना व मार्गदर्शन केले होते .
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री . बापू रोहम व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रकाश वानखेडे यांनी फैजपूर पोलीस स्टेशन चे .सहाय्यक फौजदार – विजय पाचपोळ , उमेश चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ विजय देवराम पाटील , नरेंद्र वारुळे यांचे तपासकामी पथक तयार केले होते .
अल्पवयीन मुलगी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने फैजपूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक फौजदार – विजय पाचपोळ , उमेश चौधरी यांनी जत परिसरातुन सदर अल्पवयीन मुलगी व आरोपी मुलगा – सद्दाम बाबु तडवी यांना शोधुन काढले .






