Jalana

? CRIME DAIRY… चार दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

? CRIME DAIRY… चार दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या
जालना : अंबड तालुक्यातील भालगाव शिवारात दरोडा टाकणाऱ्या चार दरोडेखोरांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 26 एप्रिल रोजी मध्यरात्री शेतवस्तीवरील दोन घरावर आठ ते नऊ अज्ञात चोरटयांनी हा दरोडा टाकला होता. या प्रकरणी पोलीस ठाणे अंबड येथे 395 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार व पोलीस ठाणे अंबड येथील एक पथक हे गुन्हा घडल्यापासुन गुन्हयाचा तपास करीत होते. 26 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अंबड येथील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी गंगाराम व्यकंटी शिंदे रा.पिठोरी सिरसगाव (वडारवस्ती) याने त्याच्या साथीदारासह केला आहे.
त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार हे सकाळी सहा वाजेच्या सुमारास पिठोरी सिरसगाव येथील त्यांच्या राहत्या वस्तीवर शेतमजुरांच्या वेषभुशेत वेशांतर करुन गेले होते. तेव्हा सदर ठिकाणी सराईत गुन्हेगार गंगाराम व्यकंटी शिंदे हा त्याचे घरात मिळुन आला. वस्तीची सर्व पथकाने पुर्णपणे पाहणी केली असता विनोद गंगाराम शिंदे, मनोज गंगाराम शिंदे, बाबु सावळा पवार सर्व राहणार पिठोरी सिरसगाव (वडारवस्ती) हे मिळुन आले. त्यांच्याकडे नमुद गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांच्या इतर साथीदारांसह केल्याचे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button