Nashik

के.आर.टी.हायस्कूल मोहाडीत शिष्यवृत्ती शिबिर संपन्न

के.आर.टी.हायस्कूल मोहाडीत शिष्यवृत्ती शिबिर संपन्न.

सुनील घुमरे नाशिक

मोहाडी येथील म.वि.प्र.समाज संस्थेच्या के.आर.टी‌.हायस्कूल , उच्च माध्यमिक विद्यालय व आय.टी.आय‌शाखेत पेरनाॅड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन ( सिग्राम ) यांच्या वतीने C.S.R. अंतर्गत अनाथ,गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती देण्यासाठी यूथ ड्रिमर्स फाऊंडेशनचे संपर्क अधिकारी रमण टेकाळे यांच्या मार्गदर्शना खाली शिष्यवृत्ती शिबीर संपन्न झाले.

प्राचार्य विजय म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती विषयी माहिती रमण टेकाळे यांनी दिली.सामाजिक जबाबदारीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पेरनाॅड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन ( सिग्राम कंपनी )दरवर्षी लाखो रुपयांची शिष्यवृत्ती देत असते व ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचण्यात यूथ ड्रिमर्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी कार्यरत असतात.
कार्यक्रमास आय.टी.आय.काॅलेजचे प्राचार्य हेमंत उगले, संजय चौधरी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सोनवणे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button