Chalisgaon

मोदी फॉर पीएम संघटनेच्या चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी गणेश पाटील यांची नियुक्ती खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते गणेश पाटील यांचा सत्कार

मोदी फॉर पीएम संघटनेच्या चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी गणेश पाटील यांची नियुक्ती खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते गणेश पाटील यांचा सत्कार

चाळीसगाव प्रतिनिधी नितिन माळे

मोदी फॉर पीएम संघटन या देशव्यापी व जगभर कार्यरत असलेल्या संघटनेच्या चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी तरुण तडफदार व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. चेतना देवरे यांचे नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे. आज खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या संघटनेच्या माध्यमातून मोठी जबाबदारी गणेश पाटील यांना मिळाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशासाठी नवीन योजनांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या कल्याणापासून तर देशाला जागतिक पातळीवर एक सक्षम राष्ट्र म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी मेहनत घेत आहेत. हे राष्ट्र सक्षम बनविण्यात तरुणांचा मोठा सहभाग असणार आहे.या हेतूने मोदीसाहेबांचे विचार तरुणांमध्ये पोहचविण्यासाठी हे संघटन अधिक प्रकर्षाने काम करतील.
या संघटनेच्या माध्यमातून मिळालेली नवीन जबाबदारी प्रामाणिक व निष्ठेने पार पडतील असा विश्वास खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केला.याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील,पंचायत समिती सदस्य कै.ची. बापू पाटील,नगरसेवक नितीन पाटील,
सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रकाका, जैन,उदय दादा पवार,भाजपचे पदाधिकारी सचिन दायमा, जेष्ठ कार्यकर्ते अविनाश कर्पे,
बंडूभाऊ पगार, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल समकीत छाजेड,ज्ञानेश्वर कुमावत,व्यापारी आघाडीचे अमित सुराणा,गौरव पुरकर,वाल्मिक महाले कुंझरकर ,कुणाल पाटील उंबरखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button