Amalner

?️ अमळनेर कट्टा…. भारतीय जनता पार्टी अमळनेर तर्फे योगदिन साजरा

?️ अमळनेर कट्टा….भारतीय जनता पार्टी अमळनेर तर्फे योगदिन साजरा

अमळनेर : योगाचार्य कमलेश महाराज यांनी योगाचे प्रशिक्षण देऊन योग करवून घेतला आणि योग दिनाचं महत्त्व देखील सांगितले.
योग हे प्राचीन भारतीय कलेचे प्रतीक मानले गेले आहे. आयुष्यात सकारात्मकता व उर्जा टिकवण्यासाठी भारतीय लोक योग महत्त्वपूर्ण मानतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तणावमुक्त करणे देखील आहे. योग हा भारतीय ज्ञानाचा पाच हजार वर्षांचा जुना वारसा आहे. महर्षि पतंजली हे योगाचे प्रणेते असल्याचे मानले जाते. योग साधनेत जीवनांचं संपूर्ण सार समाविष्ट आहे.

21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पुढाकाराने जगातील जवळपास सर्वच देशांनी निरोगी राहण्यासाठी योगाचा प्रसार करण्यासाठी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता. 21 जूनच्या दिवसाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योगाचा सतत अभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. म्हणून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.तेव्हा आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आज अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी योग करतांना प्रदेश संयोजक ऍड व्ही आर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील ,माजी सभापती श्याम अहिरे,माजी जि प सदस्य संदीप पाटील,सरचिटणीस राकेश पाटील,संचालक पराग पाटील,चंद्रकांत कंखरे, महेश पाटील,डॉ शाह,दिपक पाटील, योगीराज चव्हाण,गौरव महाजन,किरण बोरसे,आयज बागवान,राम कलोसे,रवि ठाकूर,रवि पाटील,विलास पाटील,जगदीश पाटील,भाऊसाहेब पाटील,गणेश पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button