Mumbai

?Big Breaking.. महाराष्ट्र कडक लॉक डावूनच्या उंबरठ्यावर..!येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री घेतील निर्णय..!

?Big Breaking.. महाराष्ट्र कडक लॉक डावूनच्या उंबरठ्यावर..!येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री घेतील निर्णय..!

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वेट्टीवार यांनी आज पुन्हा एकदा लॉक डाऊन संदर्भात मोठे विधान केले आहे. राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत.
राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने १ मे पर्यंत संचारबंदी आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र हे निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सरकार पुढचे पाऊल टाकण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. याबाबत आज विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान केले. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी आज सांगितले. राज्यात १ मे सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी व निर्बंध लागू करण्यात आले असले तरी गरज पडल्यास निर्बंधांचा कालावधी वाढवावा लागणार आहे, असे नमूद करत १ मे नंतरही निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत वडेट्टीवार यांनी दिले.
करोनाची दुसरी लाट सौम्य असेल असा अंदाज होता पण हा अंदाज चूकला. राज्यातील स्थिती आज गंभीर आहे. त्यामुळेच कडक लॉकडाऊनची गरज असून व्यापारी व छोट्या दुकानदारांचाही विरोध आता मावळत चालला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी नेमकी काय नियमावली निश्चित केली त्याचाही विचार केला जाणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. लोकल, अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू याबाबत सर्वंकष विचार करून अंतिम निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button